BEST (Employees’ Credit Society) कामगार पतसंस्था निवडणुकीत ठाकरे बंधू, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’ला मोठा धक्का बसला आहे. या राजकीय स्पर्धेत ठाकरे बंधूना एकही जागा जिंकता आली नाही. विशेष म्हणजे, आगामी निवडणुकीत दोनही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा असताना ‘बेस्ट कामगार पतपेढी’च्या निवडणुकीत मिळालेला दारूण पराभवामुळे चर्चेला तोंड मिळाले आहे. यावरून भाजपाचे नेते दोनही ठाकरे बंधूंवर तुटून पडले आहेत.
‘बेस्ट कामगार पतपेढी’च्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने १४ जागांवर कब्जा करत सत्ता मिळवली आहे. तर
‘सहकार समृद्धी पॅनेल’ने (BJP समर्थित) ७ जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजपाच्या ४, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या २, तर एससी-एसटी युनियनच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी २१ जागा लढवल्या होत्या, ज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या १९ आणि राज ठाकरेंच्या २ जाग्यांचा समावेश आहे. मात्र, दोनही भावांना भोपळाही फोडता आला नाही. निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारूण पराभव झाला. भाजपने या पराभवानंतर ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे.
एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते, हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल?… या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी’च्या निवडणूक निकालाकडे पाहा. कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे, अशी बोचरी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर केली आहे.
हे ही वाचा :
युक्रेन युद्धावरून रशियावर दबाव आणण्यासाठी ट्रम्पने भारतावर निर्बंध लादले!
उमराळे तलाव-आदिवासी पाड्यावर अडकलेल्यांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका!
सप्त ऋषी आरतीवेळी बाबा विश्वनाथांच्या सुवर्ण शिखरावर एक पांढरं घुबड उपस्थित असतं
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणारा अटकेत







