वीज म्हणजे तार, खांब, प्लग आणि केबल्स अशी ओळख आपल्याला आहे. मात्र, आता ही ओळख बदलण्याच्या दिशेने मोठे पाऊल ऊर्जा क्षेत्रात टाकले गेले आहे. फिनलँडमधील वैज्ञानिकांनी तारांशिवाय, हवेमधून वीज पोहोचवण्याचा यशस्वी प्रयोग करून ऊर्जा क्षेत्रात नव्या क्रांतीची ओळख करून दिली आहे. या तंत्रज्ञानाला ‘वायरलेस इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन’ असे म्हटले जात आहे.
फिनलँडमधील संशोधन संस्थांनी एकत्र येऊन असा प्रयोग केला की, ज्यामध्ये वीज कोणत्याही केबलशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आली. विशेष म्हणजे ही वीज हवेमधून प्रवास करते. आता हवेतून वीज वाहून नेण्याचा प्रयोग करणारा फिनलँड हा जगातील सर्वात पहिला देश ठरला आहे.
फिनलँडमध्ये झालेल्या या संशोधनात अल्ट्रासोनिक साउंड वेव्ह्स (अत्युच्च ध्वनीतरंग), लेझर बीम्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) एनर्जी या तिन्ही तंत्रज्ञानांचा एकत्रित वापर करण्यात आला. वैज्ञानिकांनी या संकल्पनेला “Acoustic Wire” असे नाव दिले आहे- म्हणजेच तार नसलेली पण तारासारखी काम करणारी ऊर्जा वाहिनी.
हे तंत्रज्ञान कसे काम करते?
- या प्रणालीमध्ये ऊर्जा थेट वाहत नाही, तर
- ध्वनी किंवा प्रकाशाच्या तरंगांमध्ये ऊर्जा रूपांतरित केली जाते
- ही ऊर्जा हवेमधून प्रवास करते
- समोरच्या बाजूला असलेले विशेष रिसिव्हर त्या तरंगांना पुन्हा वीजेत रूपांतरित करतात
- या प्रक्रियेत प्लग, वायर किंवा पारंपरिक ग्रिडची गरज भासत नाही.
हे ही वाचा:
अमेरिका- फ्रान्स टॅरिफ युद्ध: फ्रेंच वाइनवर २०० टक्के टॅरिफ लावणार
भारत- बांगलादेश तणावादरम्यान ‘चिकन नेक’जवळ चीनी राजदूतांचा दौरा
ग्रीनलँड आणि अमेरिका संघर्ष चिघळणार? अतिरिक्त सैन्याच्या उपस्थितीने पडले प्रश्न
अभिभाषणाच्या मसुद्यात चुकीचे दावे; तामिळनाडूच्या राज्यपालांचा सभात्याग
हे संशोधन इतके महत्त्वाचे का आहे?
आज जगभरात स्मार्ट डिव्हाइसेस, IoT (Internet of Things), सेन्सर्स, इलेक्ट्रिक वाहनं, स्मार्ट शहरे यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या सगळ्यांसाठी सतत, सुरक्षित आणि कमी खर्चात वीजपुरवठा ही मोठी गरज आहे. वायरलेस वीज तंत्रज्ञानामुळे वायरिंगचा खर्च कमी होऊ शकतो. तसेच केबल तुटणे, शॉर्टसर्किट यासारखे धोके कमी होतात, दुर्गम भागात वीज पोहोचवणे सोपे होऊ शकते आणि भविष्यात मोबाईल, सेन्सर, उपकरणे Wi-Fi प्रमाणे चार्ज होऊ शकतात.
मर्यादा काय आहेत?
हे तंत्रज्ञान सध्या प्रायोगिक टप्प्यात आहे. लांब अंतरावर मोठ्या प्रमाणात वीज पाठवणे अजून शक्य नाही कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी अधिक संशोधन आवश्यक आहे. फिनलँडमधील वायरलेस इलेक्ट्रिसिटीचा प्रयोग हा केवळ वैज्ञानिक कुतूहल नाही, तर भविष्यातील ऊर्जा व्यवस्थेचा संकेत आहे. जिथे तार नाहीत, प्लग नाहीत- फक्त हवा आणि ऊर्जा!







