गेल्या वर्षभरात रोहित शर्माने अनेक चढ-उतार पाहिले. गेल्या वर्षी जूनमध्ये रोहितच्या टीमने भारताला टी-२० विश्वचषक जिंकून दिला. पण त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्यांचा फॉर्म ढासळला. सातत्याने फलंदाजी आणि कर्णधारपद दोन्हीत अपयशी ठरत असल्याने टीकाकारांनी त्यांच्यावर टीका केली आणि त्याला संघातून वगळावे, अशी मागणी केली जाऊ लागली.
मात्र, ९ मार्च २०२५ रोजी रोहितने संपूर्ण भारताला अशी आनंदाची भेट दिली की त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकून रोहितने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपले प्रभावी नेतृत्व सिद्ध केले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताला जोरदार सुरुवात करून देत रोहितने अर्धशतक झळकावत प्रतिस्पर्धी संघाला सामन्याबाहेर फेकले.
या सामन्याआधी अनेक तर्कवितर्क लावले जात होते की रोहित वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो. मात्र, सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहितने या चर्चांना पूर्णविराम दिला.
रोहित म्हणाला, “मी निवृत्ती घेणार नाही. मी हे स्पष्ट करू इच्छितो जेणेकरून पुढे कोणत्याही अफवा पसरू नयेत. पाहूया, सध्या कोणताही भविष्यातील ठराविक निर्णय नाही, जे होत आहे ते सुरू राहील.”
सामनावीर झाल्यावर रोहित म्हणाला, “ही ट्रॉफी जिंकणे खूप खास आहे. संपूर्ण स्पर्धेत आम्ही उत्कृष्ट क्रिकेट खेळलो आणि शेवटी मेहनतीचे फळ मिळाले. ज्या पद्धतीने आम्ही या सामन्यात खेळलो, त्याने मी खूप आनंदी आहे. हे माझ्यासाठी सोपे नव्हते, पण मी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी करायचा विचार करता, तेव्हा संघाचा पाठिंबा महत्त्वाचा असतो आणि मला तो मिळाला – २०२३ विश्वचषकात राहुल भाई आणि आता गौती भाई (गौतम गंभीर) यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला.”
अंतिम सामन्यात रोहित अप्रतिम फलंदाजी करत होता आणि असे वाटत होते की तो शतक झळकावतील. मात्र, तो स्टंपिंग होऊन तंबूत परतला. फिरकीपटू रचिन रवींद्र विरुद्ध पुढे सरसावून षटकार घेचण्याच्या नादात तो बाद झाला.आहे.
रोहित म्हणाला की, याधीही मी याच प्रयत्नात बाद झालो आहे, पण मी ही पद्धत सोडण्याचा विचार केला नाही. भारतीय फलंदाजीची क्रमवारी पाहा. जडेजा आठव्या क्रमांकावर फलंदाजी करतो हे आत्मविश्वास वाढवते की तुम्ही मुक्तपणे खेळू शकता. जर रणनीती यशस्वी झाली तर उत्तमच, अन्यथा हरकत नाही.
भारताने या स्पर्धेतील सर्व सामने दुबईतच खेळले आणि प्रत्येक सामन्यात स्टेडियम हाऊसफुल्ल दिसत होते. मैदानात आणि बाहेर चाहत्यांनी संघाला भरभरून साथ दिली.
चाहत्यांबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “जे सर्व लोक आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले, त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. प्रेक्षकांचा उत्साह जबरदस्त होता. हे आमचे घरचे मैदान नव्हते, पण त्यांनी त्याला तसेच बनवले. ही विजयाची भावना खूप समाधानकारक आहे. आम्ही चाहत्यांच्या उपस्थितीचे महत्त्व ओळखतो. कदाचित ते दरवेळी दिसत नाही, पण स्टेडियममध्ये त्यांची उपस्थिती आम्हाला आणखी प्रेरणा देते.”
हेही वाचा :
सीता मातेचे मंदिर बांधण्याची क्षमता मोदी सरकारमध्येच
लाऊडस्पीकरवर भजन लावले म्हणून पुजाऱ्यावर हल्ला
कमर्शियल वाहनांच्या विक्रीला गती येणार
पुण्यात काँग्रेसला खिंडार; माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा पक्षाला राम राम
भारताने आपल्या अंतिम तीन सामन्यांसाठी चार फिरकीपटूंना संधी दिली, त्यात उपांत्य आणि अंतिम सामना समाविष्ट होते. टी-२० विश्वचषकातही रोहितने फिरकीपटूंवर भर दिला होता.
फिरकीपटूंबद्दल रोहित म्हणाला, “सुरुवातीपासूनच आमच्या फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली. त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यांनी निराश केले नाही. खेळपट्टीने त्यांना मदत केली आणि आम्ही त्याचा पूर्ण फायदा घेतला. आमची गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेत संतुलित राहिली. वरुण चक्रवर्तीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्याकडे वेगळी गुणवत्ता आहे. अशा खेळपट्टीवर तुम्हाला अशा गोलंदाजाची गरज असते. त्याने स्पर्धेची सुरुवात केली नव्हती, पण संधी मिळताच विकेट्स घेतल्या, जे आमच्यासाठी फायदेशीर ठरले.”