32 C
Mumbai
Saturday, May 27, 2023
घरविशेष'द केरळ स्टोरी'मधील अभिनेत्री अदा शर्माचा अपघात

‘द केरळ स्टोरी’मधील अभिनेत्री अदा शर्माचा अपघात

एका कार्यक्रमाला जाताना अदा शर्मा हिचा अपघात

Google News Follow

Related

‘द केरळ स्टोरी’ या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा चांगलीच चर्चेत आली आहे. सध्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरघोस प्रतिसाद मिळत असून नुकताच या सिनेमाने १०० कोटींचा टप्पाही पार केला. या सिनेमातील अदा शर्मा हिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. सध्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या टीमचे देशभरात विविध ठिकाणी दौरे सुरू आहेत. दरम्यान, अशाच एका कार्यक्रमाला जाताना अदा शर्मा हिचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा हे त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत रविवार, १४ मे रोजी एका हिंदू यात्रेत सहभागी होण्यासाठी करीमनगरला जात होते. दरम्यान, त्यांचा अपघात झाल्याची माहिती सुदिप्तो सेन यांनी दिली. सुदीप्तो सेन यांनी ट्वीट करत अपघाताबद्दल माहिती दिली. “आज आम्ही करीमनगरातील एका मेळाव्यात आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जात होतो. पण, दुर्दैवाने अपघातामुळे आम्हाला पुढचा प्रवास करता आला नाही. करीमनगरच्या जनतेची मी मनापासून माफी मागतो. आमच्या मुलींना वाचवण्यासाठी आम्ही सिनेमा बनवला आहे. कृपया आम्हाला पाठिंबा देत राहा.” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

अभिनेत्री अदा शर्मा हिनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या तब्येतीची माहिती दिली आहे. तिने ट्वीट करत लिहिलं आहे की, “मी ठीक आहे. आमच्या अपघातासंदर्भात अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, माझ्यासह आमच्या टीममधील सर्व मंडळी ठीक आहेत. कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद”.

हेही वाचा :

कर्नाटकात उपमुख्यमंत्री आणि पाच मंत्रीपदे मुस्लिमांना द्या

आता ९२८ संरक्षण उत्पादनांची निर्मिती होणार भारतात

‘मी देशभक्त असण्याची शिक्षा भोगतोय’

कर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत; भाजपाची हार, जनता दलानेही गमावला विश्वास

‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित होताच हा सिनेमा वादाच्या गर्तेत अडकला होता. मात्र, प्रदर्सजोत होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या सिनेमाने शनिवारी १०० कोटींचा आकडा गाठला. २०२३ मधील १०० कोटींचा आकडा गाठणारा हा चौथा चित्रपट आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल शाह यांनी निर्मिती केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,020अनुयायीअनुकरण करा
74,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा