32 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरविशेष'द केरळ स्टोरी' हा अंतर्बाह्य हादरवून टाकणारा अनुभव

‘द केरळ स्टोरी’ हा अंतर्बाह्य हादरवून टाकणारा अनुभव

महिलांसाठी आयोजित विशेष शोदरम्यान व्यक्त झाली भावना

Google News Follow

Related

द केरळ स्टोरी या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा आहे. या चित्रपटातून लव्ह जिहाद आणि त्यातून हिंदू मुलींना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्याचे भयानक वास्तव दाखविण्यात आले आहे. या वास्तवाची जाणीव सर्वसामान्यांनाही व्हावी यासाठी भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली येथील १०१ मॉलमधील पीव्हीआर सिनेमात या चित्रपटाचा खास शो महिलांसाठी आयोजित केला होता. रविवारी सकाळी ९.३० वाजता या शोचे विशेष आयोजन करण्यात आले होते. त्याला महिलांनीही भरभरून प्रतिसाद दिला.

हा चित्रपट पाहायला आलेल्या महिलांनीही हा विषय प्रथमच आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून समजून घेता आल्याची भावना व्यक्त केली. संपूर्ण समाजाला यापासून सावध राहण्याची गरजही महिलांनी व्यक्त केली.
हा चित्रपट पाहायला आलेल्या सुनीता अगरवाल म्हणाल्या की, हा विषय काश्मीर फाइल्सपेक्षाही भिन्न आहे आणि तेवढाच गंभीरही. या विषयाला घराघरात पोहोचविले जाणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा फडणवीसांना मेसेज

बजरंग दल करणार सामुहिक हनुमान चालीसा पठण

तामिळनाडूच्या थिएटर मालकांकडून ‘द केरळ स्टोरी’ला मनाई

मोचा चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता

एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले की, कोणत्या एका धर्माला लक्ष्य करणारा चित्रपट नाही तर आयसीससारख्या दहशतवादी संघटनेचे भयंकर कारस्थानी रूप दाखविणारी ही फिल्म आहे. या चित्रपटाविषयी आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, हा चित्रपट म्हणजे अंतर्बाह्य हादरवून सोडणारा अनुभव आहे. देशभरात जे घडते आहे त्याचे प्रतिबिंब चित्रपटात पाहायला मिळते. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू तरुणींना दहशतवादात ढकलण्याच्या कारस्थानाचा बुरखा हा चित्रपट फाडतो. त्या विरोधात जागृती होण्याची नितांत गरज आहे, असा संदेश हा चित्रपट देतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा