27 C
Mumbai
Sunday, March 26, 2023
घरविशेषगुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही मिळणार आनंदाचा शिधा

गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही मिळणार आनंदाचा शिधा

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Google News Follow

Related

राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी फक्त १०० रुपयांमधे आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता दिवाळीच नाही तर गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही आनंदाचा शिधा मिळणार आहे. यासंदर्भातील निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.

या आनंदाच्या शिधामध्ये १ किलो रवा, १ किलो चणा डाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल याचा समावेश आहे. आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील १ महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल असे राज्य सरकारने म्हटले आहे.

हे ही वाचा:

या २० देशांतील नागरिक करू शकतील भारतात UPI द्वारे व्यवहार.. जाणून घ्या तपशील

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ.. हेरगिरी प्रकरणी खटला चालवण्यास मंजुरी

एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज!

हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२२ मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत २७९ प्रति संच या दरानुसार ४५५ कोटी ९४ लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी १७ कोटी ६४ लाख अशा ४७३ कोटी ५८ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा