36 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषमेटे प्रकरणामुळे घेतला धसका; आमदारांच्या चालकांना शिकवणार ड्रायव्हिंग

मेटे प्रकरणामुळे घेतला धसका; आमदारांच्या चालकांना शिकवणार ड्रायव्हिंग

आमदारांच्या चालकांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

Google News Follow

Related

शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांच्या गंभीर अपघाती निधनाचा संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. हा अपघात की घातपात यावरूनही तर्क वितर्क सुरू झाले हाेते. घाटात ओव्हरटेक करताना चालकाचा अंदाज चुकून कार ट्राॅलीला धडकली असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. मेटे यांच्या अपघाताचा आमदारांनी आपल्या सुरक्षिततेच्यादृष्टीने धसका घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता आमदारांच्या चालकांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता आमदारांचे चालक लवकरच ड्रायव्हिंगचे धडे गिरवताना पहायला मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला नेमका कसा अपघात झाला हे विधानसभेत स्पष्ट केलय. उपमुख्यमंत्री म्हणाले,ओव्हरटेक करताना चालकाचा अंदाज चुकल्याने मेटे यांची कार बाजुने जात असलेल्या ट्रकट्राॅलीला जाऊन धडकली. चालक गाेंधळलेला हाेता. मेटे यांच्या चालकाने ११२ ला फाेन केला व टनेलच्या जवळ या असे सांगितलं पण तेथे काहीच नव्हतं. चालकानं लाेकेशन व्यवस्थित सांगितलं असतं तर मुंबई पाेलीस वेळेवर पाेहचले असते.

हे ही वाचा:

एम्स आता ओळखले जाणार ‘या’ नावाने

इकबाल कासकरच्या बॉडीगार्डला मारणाऱ्या फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

“उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांसारखा तह करायला हवा होता”

सिसोदियांसह १३ जणांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

२४ ऑगस्टला प्रशिक्षण

भविष्यात अशा प्रकारचे अपघात हाेऊ नये यासाठी सर्वच आमदार सतर्क झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने आमदारांच्या चालकांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय तातडीनं जाहीर केला आहे. आता येत्या बुधवार २४ ऑगस्ट राेजी राज्यातील सर्व आमदारांच्या चालकांसाठी मुंबईतल्या वाय.बी. चव्हाण सेंटर येथे हे प्रशिक्षण शिबीर आयाेजित करण्यात आलं आहे. हे प्रशिक्षण शिबीर सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत हेणार आहे. भविष्यात अशा प्रकारचा अपघात घडण्याची शक्यता कमी करण्याचा उद्देश यामागे आहे.

११२वर लाेकेशन दिसणार

आमदार मेटे यांच्या अपघाताचे लाेकेशन न कळणे हा या अपघातातील कळीचा मुद्दा समाेर आहे. कारण चालकाने ११२ वर काॅल केला पण त्याने लाेकेशन चुकीचं सांगितलं हाेते. त्यावर बाेलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, मदतीसाठी काेणी फाेन केल्यावर लाेकेशनच्या आधारावर पाेलिसांना अपघाताचं ठिकाण कळेल अशी यंत्रणा निर्माण केली जाईल . यापुढं ११२ नंबरवर काॅल केल्यावर लाेकेशन दिसणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा