26 C
Mumbai
Saturday, March 7, 2026
घरविशेषसंत परंपरा संस्कृतीची पायाभरणी असून भक्तांना अध्यात्मिक प्रेरणा, समाजसेवेचे बळ मिळेल!

संत परंपरा संस्कृतीची पायाभरणी असून भक्तांना अध्यात्मिक प्रेरणा, समाजसेवेचे बळ मिळेल!

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आमदार अतुल भातखळकर यांनी केले विधान

Google News Follow

Related

आज सावित्रीबाई फुले मैदान – लोखंडवाला संकुल, कांदिवली (पूर्व) येथे ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी’ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम स्थळी कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद पार पडली. या प्रसंगी आमदार भातखळकर यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की “संत परंपरा ही आपल्या संस्कृतीची पायाभरणी आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून भक्तांना अध्यात्मिक प्रेरणा आणि समाजसेवेचे बळ मिळेल.”

हे ही वाचा..

चेन्नईत भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले; वैमानिक बचावला

“बिहार निवडणुकीचा निकाल निराशाजनक; काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज”

‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ने अल- फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व केले निलंबित

“बिहार जिंकले आता लक्ष्य पश्चिम बंगालवर”

‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा’ या तीन दिवसीय कार्यक्रमानिमित्त दिनांक : १५, १६ आणि १७ नोव्हेंबर २०२५ (कार्तिक वद्य त्रयोदशी) रोजी सावित्रीबाई फुले मैदान, फाऊंडेशन शाळेसमोर, लोखंडवाला संकुल, कांदिवली (पूर्व) येथे दिंडी सोहळा, भव्य भजन स्पर्धा, भक्ती संगीताचा कार्यक्रम आणि संत दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह सहभागी होऊन संतपरंपरेच्या महिमा, भक्ती, सेवा आणि सद्भावनेने व्यक्त होणारा अद्वितीय उत्सव आवर्जून सामिल व्हा, असे आवाहन आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थितांना केले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा सांप्रदायिक संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा