28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेष‘टीम इंडियाचे नक्कीच काहीतरी बिनसलेय...’

‘टीम इंडियाचे नक्कीच काहीतरी बिनसलेय…’

भारतीय संघ नवे चोकर्स आहेत का, या प्रश्नावर व्यंकटेश प्रसाद यांची टिप्पणी

Google News Follow

Related

भारतीय क्रिकेट संघाने सन २०१३पासून आतापर्यंत एकही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली नाही. शेवटचा चषक भारताने एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखाली उंचावला होता. तेव्हा भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे भारत हा नवा चोकर्स म्हणून ओळखला जातोय का, यावर ‘नक्कीच काहीतरी बिनसलेय’, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी दिली आहे.

भारताचा हा चषकांचा १० वर्षांचा दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी सन २०२३मध्ये दोनदा भारतीय संघाला मिळाली होती. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोनदा पोहोचला आणि त्यांनी घरच्या मैदानावर एकदिवसीय चषक स्पर्धेत खेळताना सलग १० सामने जिंकले. मात्र पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय संघाचे हे स्वप्न धुळीस मिळवले. त्यामुळे भारतीय संघ नवा चोकर्स म्हणून ओळखला जातोय काय़, असा प्रश्न माजी गोलंदाज व्यंकटेश प्राद यांना एका नेटिझनने विचारला.

हे ही वाचा:

निमंत्रण फक्त रामभक्तांना, मुख्य मंदिर पुजाऱ्यांकडून उद्धव आणि राऊतांची खरडपट्टी!

नव्या वर्षात भारतीय क्रिकेट संघ राहणार ‘बिझी’

भारतासोबतचे संबंध बिघडत असताना, मालदीवचे राष्ट्रपती चीनला भेट देण्याची शक्यता!

बिहारमध्ये एका रात्रीत तलाव चोरीला

त्यावर भारताने सन २०१८-१९मध्ये आणि सन २०२०-२१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या कसोटी मालिकेतील विजयाची आठवण करून दिली. त्यावर अनुभवी क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीत आपण हा विजय मिळवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ‘आपण चोकर्स नाही. आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियातच दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. सन २०२०-२१मध्ये ३६ धावांवर सर्व बाद झाले असताना आपण मिळवलेला विजय महत्त्वाचा होता. तेव्हा पहिल्या पसंतीचे खेळाडू मैदानात नव्हते. परंतु तरीही गेल्या ११ वर्षांत आपण महत्त्वाची कुठलीच स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे नक्कीच काहीतरी बिनसले आहे,’ अशी प्रतिक्रिया व्यंकटेश प्रसाद यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा