२१ तारखेला, मुंबईतील मानखुर्द येथील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये दुर्गादेवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना घडली. त्यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आणि त्याच दिवशी नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली. मंत्री नितेश राणे यांनी त्याच मंडपाला भेट दिली आणि आरती केली. या घटनेवरून त्यांनी संताप व्यक्त करत इशारा दिला. दरम्यान, या घटनेसंदर्भात पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे, तर इतर तिघे अजूनही फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.
मंत्री नितेश राणे यांनी जय श्री राम या घोषणेसह आपले भाषण सुरू केले आणि म्हणाले, “आपलं हे हिंदू राष्ट्र आहे ना. इथे कोणाचं दुसऱ्याचं चालणार नाही. आपण आपल्या हिंदू राष्ट्रांमध्ये, आपण अतिशय शांततेत कोणालाही न दुखावता आम्ही जर आमचे सण साजरे करत असू तर कोणालाही हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही.”
“आमच्या देशामध्ये सर्वात आधी हिंदुंचे हित बघितलं जाईल आणि मग बाकीच्यांचं. हा देश हिंदुंचा आहे. इकडे सर्वधर्म समभाव नाही चालणार. इकडे आधी हिंदुंचं हित पाहिलं जाईल. कुठे गेले ते गंगा जमुना वाले?. आमच्या देवीचा हात तोडल्यानंतर तेव्हा लेक्चर द्यायला येत नाहीत” असे नितेश राणे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “जे लपले आहेत त्यांनी ऐकावे की आम्ही सर्वांना एक-एक करून अटक करू. कोणालाही सोडले जाणार नाही. जर कोणी आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मुंबईतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर हे आपले देवा भाऊंचे सरकार आहे, कोणालाही सोडले जाणार नाही. जाण्यापूर्वी मी म्हणेन की या ९ दिवसात नवरात्र पूर्ण उत्साहाने साजरी करा, पूर्ण उत्साहाने गरबा करा आणि परवानगीबाबत काही अडचण असेल तर आम्ही येथे उपस्थित आहोत. आम्हाला फोन करा. मी तुम्हाला वचन देतो की ज्या जिहादींनी हे कृत्य केले आहे ते जास्त काळ त्यांच्या पायावर चालू शकणार नाहीत.”
हे ही वाचा :
रेल्वेवरून डागता येणार क्षेपणास्त्र; ‘अग्नी-प्राईम’ची यशस्वी चाचणी
लेहमधील हिंसक आंदोलनासाठी सोनम वांगचुक जबाबदार!
‘आय लव्ह महादेव’ पोस्टवरून गुजरातमध्ये संघर्ष, दगडफेक, वाहने जाळली!
भारत विरुद्धच्या सामन्यात पाक खेळाडूंच्या चिथावणीखोर हावभावांविरुद्ध आयसीसीकडे तक्रार
“या जियाद्यांना का नाही सांगत?.हे हिंदुत्व विचारांचं राज्य सरकार आहे. आम्ही सगळे मंत्री, आमदार हे हिंदुंच्या मतांवर झालेलो आहोत. मोहम्मद बॅनर लावून काही होत नाही. हा त्यांच्या बापाचा पाकिस्तान नाही. हा हिंदुस्थान आहे. धार्मिक सलोख्याबद्दल बोलणारे कुठे गेले आहेत? त्यांनी आमच्या देवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याचा निषेध का केला नाही? इथला आमदार कुठे गेला आहे? तो उंदरासारखा कुठे लपला आहे? तो बाहेर का येत नाही? ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला तुमचे सण शांततेत साजरे करण्याची परवानगी देतो, त्याचप्रमाणे जर तुम्ही आमच्या सणांवर नकारात्मक नजर टाकली तर पुढच्या वेळी ईद आणि मोहरमच्या वेळी आपल्यालाही विचार करावा लागेल”, असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला.







