पश्चिम बंगाल: शितला मातेच्या मूर्तीची कट्टरवाद्यांकडून तोडफोड करत जाळपोळ!

हिंदू स्थानिकांकडून आरोपीला चोप देत पोलिसांच्या केले स्वाधीन

पश्चिम बंगाल: शितला मातेच्या मूर्तीची कट्टरवाद्यांकडून तोडफोड करत जाळपोळ!

बांगलादेशात वारंवार अल्पसंख्यांक विशेषतः हिंदू समाजावर अत्याचार होत आहे. चोरी, हाणामारी, जाळपोळ, अपहरण, अत्याचार आणि हत्येच्या बातम्या दररोज समोर येत आहेत. अशा घटनांमुळे भयभीत झालेला तेथील हिंदू कट्टरवाद्यांवर कारवाईची मागणी करत आहे. मात्र, अद्याप युनुस सरकारकडून कोणत्याही कारवाईची बातमी समोर आलेली नाही. याच दरम्यान आणखी एक व्हिडीओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये कट्टरवाद्यांकडून हिंदूंच्या मंदिराला लक्ष करण्यात आले आहे. परंतु, ही घटना बांगलादेशातील नसून पश्चिम बंगालमधील आहे. या घटनेमुळे बांगलादेशात तर हिंदू समाज सुरक्षित नाहीच मात्र, आता पश्चिम बंगालमध्ये देखील हिंदू सुरक्षित नसल्याचे दिसत आहे.

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बरुईपूरच्या फुलताळा गावातील शितला मातेच्या मंदिरावर मुस्लीम तरुणाकडून हल्ला केल्याचे समोर आले आहे. अत्रक मोल्ला असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. अत्रक मोल्लाने गावातील शितला मातेच्या मंदिरात शिरकाव करत शितला मातेच्या मूर्तीची तोडफोड केली.

हे ही वाचा : 

परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर ओमर अब्दुल्ला म्हणतात, पीओके घेण्यापासून कोण रोखत आहे?

महाराष्ट्रात गेल्या १० वर्षांतील गुंतवणूक अवघ्या नऊ महिन्यात

भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री परत येतोय, निवृत्तीतून घेतला यू-टर्न!

मुंबई काँग्रेस कार्यालयाचे १८ लाख भाडे, ५ लाखांचे वीज बिल थकले, आता टाळे लागणे बाकी!

संतापजनक म्हणजे, देवीच्या मूर्तीच्या तोडफोड करत मूर्ती जाळून टाकली. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या घटनेनंतर संतापलेल्या स्थानिक हिंदुनी आरोपी अत्रक मोल्लाला पकडले आणि त्याला चोप दिला. यावेळी महिला देखील बाहेर पडल्या. आरोपी पळून जावू नये यासाठी स्थानिकांनी त्याच्या हाताला दोरखंड बांधून खांबाला बांधले. यानंतर स्थानिकांनी पोलिसांनी माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांनी आरोपीला ताब्यात दिले. दरम्यान, या घटनेनंतर हिंदू समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांच्या कारवाईवर आता सर्वांचे लक्ष आहे.

Exit mobile version