शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. मुंबई काँग्रेस कार्यालयाचे १८ लाख भाडे आणि ५ लाखांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेस कार्यालयाला आता कुलूप लावायचे राहिले आहे, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस ठाकरेंच्या पायातील वहाण बनले असल्याचे संजय निरुपम म्हणाले आहेत.
संजय निरुपम ट्वीटकरत म्हणाले, कार्यालयाचे भाडे वर्षानुवर्षे दिलेले नाही. थकबाकीची रक्कम १८ लाख रुपये झाली आहे. वीज बिलाची थकबाकी ५ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. वीज खंडित झाली होती. वितरकाने तर मीटर काढून घेतला असल्याचा दावा निरुपम यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले, मी चार वर्षे मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो. अशी लज्जास्पद परिस्थिती यापूर्वी कधीही उद्भवली नव्हती.
मुंबई काँग्रेस चालवण्याचा मासिक खर्च १४ लाख रुपये होता. यामध्ये कार्यालयाचे भाडे, वीज बिल आणि सर्व कर्मचाऱ्यांचे पगार यांचा समावेश होता. मी ऐकले आहे की मुंबई काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांना गेल्या १० महिन्यांपासून त्यांचे पगार मिळालेले नाहीत.
हे ही वाचा :
कोविड काळात केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींना बार्बाडोसचा पुरस्कार
छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला; अनिल परबांच्या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांकडून निषेध
गोव्यात मारामारीवरून अबू आझमी यांच्या मुलावर गुन्हा
दहशतवादी तहव्वूर राणाला दणका! प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली
माझ्या काळात फक्त एकच अस्वस्थ परिस्थिती उद्भवली जेव्हा मला चहा विक्रेत्याकडून मोठे बिल आले.
पण ते त्याचे जास्त बिल होते. ते देखील संपूर्ण मिटवून टाकले. माझ्या काळातही पक्ष विरोधी पक्षात होता आणि मी खासदारही नव्हतो. मग आज पक्षाची इतकी वाईट अवस्था का झाली?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, एक नेते YouTube वर व्हिडिओ बनवण्यात व्यस्त आहेत. दुसरे म्हणजे, काँग्रेस पक्ष पूर्णपणे उबठाच्या पायातील वहाण बनली आहे. मी वर्षांपूर्वी सांगितले होते की, काँग्रेस पक्षाचे काम उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे सोपवू नका. खर्गे आणि वेणुगोपाल सारखे अत्यंत ज्ञानी लोक माझ्याकडे दुर्लक्ष करत राहिले. आज बघा सत्य परिस्थिती डोळ्यासमोर आहे, असे संजय निरुपम म्हणाले.
मुंबई कांग्रेस के दफ़्तर पर बस ताला लगना बाक़ी है।
दफ़्तर का भाड़ा वर्षों से नहीं भरा गया है।
बकाया 18 लाख हो गया है।
बिजली बिल का बकाया 5 लाख हो गया है।
बिजली कट गई थी।डिस्ट्रीब्यूटर मीटर उठाकर ले गया था।
(FYI दक्षिण मुंबई में बिजली सप्लायर अदानी नहीं बेस्ट है)मैं चार वर्षों…
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) March 7, 2025