31 C
Mumbai
Sunday, March 16, 2025
घरक्राईमनामागोव्यात मारामारीवरून अबू आझमी यांच्या मुलावर गुन्हा

गोव्यात मारामारीवरून अबू आझमी यांच्या मुलावर गुन्हा

Google News Follow

Related

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबचे उदात्तीकरण केल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती. विधिमंडळ अधिवेशनातून अबू आझमी यांना निलंबितही करण्यात आले. दरम्यान, त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतल्याचे म्हटले होते. एकीकडे अबू आझमी यांनी औरंगजेबचा उदो उदो केल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढलेल्या असताना दुसरीकडे अबू आझमी यांचा मुलगा अबू फरहान आझमी याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवा पोलिसांनी मंगळवारी महाराष्ट्रातील सपा आमदार अबू आझमी यांचा मुलगा अबू फरहान आझमी आणि इतरांविरुद्ध राज्यातील सार्वजनिक ठिकाणी भांडण आणि शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. रेस्टॉरंटचालक आणि उद्योजक अबू फरहान आझमी हा अभिनेत्री आयशा टाकिया हिचा पती आहे. गोवा पोलिसांनी म्हटले आहे की, त्यांच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री ११.१२ वाजता एक फोन आला, ज्यामध्ये कॅन्डोलिम (उत्तर गोवा जिल्हा) येथील एका सुपर मार्केटमध्ये भांडण सुरू असल्याची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना माहिती मिळाली की दोन गटांमध्ये, ज्यामध्ये फरहान आझमीचाही समावेश होता एका किरकोळ कारणावरून भांडण झाले आहे. या वादात सहभागी असलेल्या दोन्ही पक्षांना नंतर कळंगुट पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांना तक्रार दाखल करण्याची संधी देण्यात आली होती, परंतु दोन्ही पक्षांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला.

या प्रकरणावर बोलताना वरिष्ठ पत्रकार पंकज प्रसून यांनी म्हटले की, या वादाला महाराष्ट्र विरुद्ध गोवा असे दाखवण्यात आले. भांडण झाल्यानंतर फरहान हा आपण आमदाराचे पुत्र असल्याचे सांगत होता. त्याने त्याच्याकडील बंदूकही दाखवली. दरम्यान, फरहान याची पत्नी आयेशा टाकिया हिने सोशल मीडियावर दावा केला आहे की, तिच्या पतीला आणि मुलाला धमकावण्यात आले, मानसिक त्रास दिला गेला. ती रात्र एक भयंकर होती. स्थानिक गुंडांनी त्रास दिला. पतीने आमच्या आणि मुलाच्या सुरक्षेसाठी पोलिसांना फोन केला. पण लोकांनी पोलिसांशीही गैरवर्तन केले. गोव्यात स्थानिकांकडून तिचा पती फरहान आझमी आणि त्यांच्या मुलाला वारंवार शिवीगाळ करण्यात आली कारण त्यांच्या मनात महाराष्ट्रातील लोकांबद्दल द्वेष आहे.

हे ही वाचा:

दहशतवादी तहव्वूर राणाला दणका! प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शिव व्याख्याते घडवणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन

औरंगजेबाची कबर खोदून अरबी समुद्रात फेकून द्या!

१०६ बळी घेणाऱ्या पक्षाच्या मांडीवर बसल्याबद्दल ठाकरेंनी हुतात्मा चौकात माफी मागावी!

पोलिसांनी सांगितले की, अबू फरहान आझमी, झिओन फर्नांडिस, जोसेफ फर्नांडिस, शाम आणि इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम १९४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार, आझमी त्यांचा अल्पवयीन मुलगा आणि चालक शाम मर्सिडिज एसयूव्ही वाहनातून प्रवास करत होते. सुपरमार्केटच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या वाहनातील प्रवाशांशी त्यांचा वाद झाला. आझमी यांच्या वाहनाने डाव्या बाजूला वळत असताना सिग्नल दिला नाही, असा आरोप मागच्या वाहनातील इसमाने केला. यावरून आझमी आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर स्थानिक लोक आणि मागच्या वाहनातील इसमाचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा