छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीमार्फत मुंबईत व्याख्याते घडवणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ही विशेष कार्यशाळा घेण्यात येणार असून या कार्यशाळेमध्ये अधिकाधिक शिवभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मुंबईतील कुर्ला येथे शिव व्याख्याते घडवणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीमार्फत हा पुढाकार घेण्यात आला आहे. रविवार, ९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता तेरापंथ हॉल, सुभाष नगर समोर, न्यू मिल रोड, कुर्ला पश्चिम येथे ही कार्यशाळा होणार आहे.
- दिनांक: रविवार, ९ मार्च २०२५
- वेळ: सायंकाळी ४ वाजता
- पत्ता: दुसरा माळा, तेरापंथ हॉल, सुभाष नगर समोर, न्यू मिल रोड, कुर्ला (प.), मुंबई ४०० ०७०