मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात भारतात होणाऱ्या प्रत्यार्पणावर तात्काळ स्थगिती मागितली होती. तहव्वूर राणा याचे म्हणणे होते की, त्याच्या राष्ट्रीय, धार्मिक आणि सामाजिक ओळखीमुळे भारतात त्याचा छळ केला जाईल आणि त्याला ठार केले जाईल. यानंतर तहव्वूर राणा याला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दणका देत त्याची याचिका फेटाळून लावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पण निर्णयाला मंजुरी दिली होती. पुढे काही आठवड्यांनंतर, आरोपी तहव्वुर राणाने भारताकडे प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी करण्यासाठी याचिका केली होती ती आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एलेना कागन यांनी राणाच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर, त्यांच्या वकिलांनी कागन यांना उद्देशून पूर्वी पाठवलेल्या आपत्कालीन अर्जाचे नूतनीकरण केले, ज्यामध्ये नूतनीकरण केलेला अर्ज अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांच्या सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्याची विनंती करण्यात आली.
दहशतवादी तहव्वूर राणा याने याचिकेत म्हटले होते की, तो पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम आहे आणि पाकिस्तानी सैन्याचा माजी सदस्य आहे, त्यामुळे त्याला कोठडीत छळ सहन करावा लागू शकतो आणि शिवाय त्याच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. राणाने असा दावा केला आहे की, त्याला पोटाचा विकार (abdominal aortic aneurysm) असून त्यामुळे मूत्राशयाचा कर्करोग होऊ शकतो. त्याने पुढे आरोप केला आहे की, भारत सरकार हुकूमशाही करत आहे. यासाठी त्याने ह्यूमन राईट्स वॉच २०२३ वर्ल्ड रिपोर्टचा हवाला दिला आहे. ज्यामध्ये भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांवर, विशेषतः मुस्लिमांवर भेदभाव केल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा:
राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शिव व्याख्याते घडवणाऱ्या कार्यशाळेचे आयोजन
औरंगजेबाची कबर खोदून अरबी समुद्रात फेकून द्या!
१०६ बळी घेणाऱ्या पक्षाच्या मांडीवर बसल्याबद्दल ठाकरेंनी हुतात्मा चौकात माफी मागावी!
उद्धव ठाकरे, चिता कॅंपची भाषा कोणती?
अमेरिकेने तहव्वूर राणाच्या भारत प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे. तसेच निर्णय जाहीर करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याला अत्यंत वाईट म्हटले होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पण करण्याला मंजुरी मिळाली होती. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक राणाचे प्रत्यार्पण करण्याची भारताची बऱ्याच काळापासून मागणी होती.