मुघल सम्राट औरंगजेबबाबत देशभर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, हिंदू सेनेने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे एक मोठी मागणी केली आहे. हिंदू सेनेचे नेते विष्णू गुप्ता यांनी गृह मंत्रालयाला पत्र पाठवून तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. औरंगजेबला ‘क्रूर’ शासक घोषित करावे, त्याची कबर खोदून त्याचे अवशेष अरबी समुद्रात विसर्जित करावेत आणि त्याच्या नावाशी संबंधित रस्ते आणि ठिकाणे बदलावीत अशा मागण्या विष्णू गुप्ता यांनी केल्या आहेत. यासह औरंगजेबाच्या कबरीवर बांधलेल्या जागेचा वापर शाळा किंवा रुग्णालय बांधण्यासाठी करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
विष्णू गुप्ता यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात औरंगजेबाचा इतिहास आणि त्याच्या क्रूरतेचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, औरंगजेबाने हिंदू मंदिरे आणि मठ नष्ट केले आणि अनेक हिंदू संत आणि नेत्यांची हत्या केली. महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर खोदून त्याचे अवशेष अरबी समुद्रात विसर्जित करावेत आणि त्या जागेचा पुनर्वापर करावा, असे विष्णू गुप्ता म्हणाले.
हे ही वाचा :
मुंबई शहरात उपकरप्राप्त इमारतींना लागू असणारा कायदा उपनगरात लागू करा
दलित मुलीचे अपहरण करून अत्याचार, हातावरील ‘ओम’ पुसण्यासाठी ओतले अॅसिड, खायला दिले बीफ!
१०६ बळी घेणाऱ्या पक्षाच्या मांडीवर बसल्याबद्दल ठाकरेंनी हुतात्मा चौकात माफी मागावी!
अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होळी कार्यक्रमाला परवानगी नाकारली
अजमेर शरीफ दर्ग्यात शिवमंदिर असल्याच्या दाव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले विष्णू गुप्ता यांनी आपल्या पत्रात म्हटले की, औरंगजेबाने केवळ हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली नाहीत तर गुरु देघ बहादूर सिंह, गोकुळ जाट आणि छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली. दरम्यान, औरंगजेबाचे गुणगान गाणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.