मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींना जो कायदा लागू होतो तोच कायदा उपनगरातील भाडेकरुंच्या इमारतीला लागू व्हावा, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभेत केला.
आमदार भातखळकर म्हणाले, हा कायदा उपनगरातील इमारतींना लागू करावा यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हा कायदा नेमका कधी लागू करणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे.
हेही वाचा..
दलित मुलीचे अपहरण करून अत्याचार, हातावरील ‘ओम’ पुसण्यासाठी ओतले अॅसिड, खायला दिले बीफ!
१०६ बळी घेणाऱ्या पक्षाच्या मांडीवर बसल्याबद्दल ठाकरेंनी हुतात्मा चौकात माफी मागावी!
अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होळी कार्यक्रमाला परवानगी नाकारली
उद्धव ठाकरे, चिता कॅंपची भाषा कोणती?
ते म्हणाले, मुंबई शहरात उपकर प्राप्त इमारतींना जो कायदा लागू करण्यात आला आहे तो कायदा उपनगरात सुद्धा लागू करण्याबद्दल शासन सकारात्मक आहे. येणाऱ्या तीन महिन्यात हा निर्णय सरकार करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच मुंबईतील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.