26 C
Mumbai
Thursday, July 25, 2024
घरविशेष'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने'तून वर्षाला मिळणार तीन गॅस सिलिंडर मोफत

‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’तून वर्षाला मिळणार तीन गॅस सिलिंडर मोफत

महिलांना दिलासा देणाऱ्या राज्य सरकारच्या योजनेची अजित पवारांकडून घोषणा

Google News Follow

Related

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली असून शुक्रवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, सर्वसामान्य वर्ग आणि महिलांसाठी काही दिलासा देणाऱ्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. अजित पवारांनी यांनी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ची घोषणा केली आहे.

स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा अगदी जवळचा संबंध असल्याचे म्हणत अजित पवार म्हणाले की, महिलांच्या आरोगांच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधनाचा पुरवठा करणे ही जबाबदारी आहे. एलीपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असा पर्याय मानला जातो. त्यामुळे याचा वापर वापर वाढवला पाहिजे, असा प्रयत्न आहे. गॅस सिलिंडर प्रत्येकाला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ अजित पवारांनी जाहीर केली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

महिलांच्या विकासाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांचीही अजित पवारांनी माहिती दिली. महाराष्ट्रात ६ लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून ती संख्या ७ लाख करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांच्यासाठीच्या निधीची रक्कम १५ हजाराहून ३० हजारांपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत महिलांना दरमहा मिळणार १५०० रुपये

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ‘एक अकेला मोदी, सब पे भारी’च्या घोषणा

२००९ मध्ये उद्घाटन केलेल्या टर्मिनल- १ च्या छताचा भाग कोसळल्याची नागरी उड्डाण मंत्र्यांची माहिती; काँग्रेसची बोलती केली बंद

महिला लघुउद्योजिकांनी १५ लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी ‘आई योजना’ सुरू करण्यात आली आहे. महिला व बालकांविरोधातील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी १०० विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

काही महत्त्वाच्या योजना-

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 
  • आई योजना
  • लेक लाडकी योजना
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा