छत्तीसगडच्या रायपूरमध्ये जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला आहे. माधवराव सप्रे शाळेबाहेर मुलांचे धर्म बदलण्याचा प्रयत्न सुरू होता. या प्रकरणात तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिलांनी शाळेबाहेर मुलांना फसवण्याचा प्रयत्न केला.
आरोपानुसार, शाळेची शेवटची बेल वाजल्यानंतर या महिलांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली आणि हिंदू देव-देवतांबद्दल चुकीची माहिती दिली. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांसमोर हिंदू देवतांचा अपमान केला. घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनेचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
ज्या मुलांशी महिलांनी संवाद साधला ते ९वी आणि १०वी वर्गातील आहेत. विद्यार्थ्यांनी सांगितले की, शेवटची बेल वाजल्यानंतर जेव्हा विद्यार्थी बाहेर आले, तेव्हा तीन महिला एका ऑटोमधून उतरून त्यांच्या जवळ आल्या.
महिलांनी विद्यार्थ्यांना विचारले की, “तुम्ही ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवता का? चर्चमध्ये जाता का?” विद्यार्थ्यांनी सांगितले की, “आम्ही चर्चमध्ये जात नाही, आम्ही हिंदू आहोत.” त्यानंतर महिलांनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची विनंती केली. विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्या महिलांनी सांगितले की, “जर तुम्ही चर्चमध्ये गेलात, तर तुम्ही अभ्यासात हुशार व्हाल. सर्व रोग बरे होतील. तुम्ही हे घरच्यांना सांगितले, तर त्यांचे रोगही बरे होतील.”
हे ही वाचा:
‘आणीबाणीच्या काळात संविधानाची हत्या झाली’
बांगलादेशातील हिंदू महिलेवरील बलात्काराने जगभरात संताप!
कोलकाता बलात्कार प्रकरणी तृणमूल काँग्रेसमध्येच खडाजंगी
आरसीबीचा गोलंदाज यश दयालवर लैंगिक छळाचा आरोप…
मात्र, विद्यार्थ्यांनी नकार दिल्यावर महिलांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्थानिक हिंदू संघटनेला याची माहिती दिली, ज्यांनंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्या महिलांनी आपली नावे ममता चौहान, नम्रता चौहान आणि विभा मसीह अशी सांगितली.
या प्रकरणाची माहिती देताना कोतवाली पोलिस ठाण्याचे सीएसपी केसरी नंदन नाईक यांनी सांगितले की, तिन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे. हिंदू संघटनांनी तक्रार केली होती की, या महिला विद्यार्थ्यांवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकत होत्या. पोलिस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि पुढील कारवाई केली जाईल.







