कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मनोजित मिश्रा बद्दल अनेक खुलासे झाले आहेत. आता त्याच्या एका जुन्या फेसबुक पोस्टची चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. यावर आरोपी मनोजितने १६ ऑगस्ट २०२४ रोजी सोशल मीडिया पोस्ट लिहून बलात्कार्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.
या पोस्टसोबत त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या समर्थकांसह रस्त्यावर दिसत आहेत. आरोपीने लिहिले आहे की, ” बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मला न्याय हवा आहे, नाटक नको. मला त्वरित न्याय हवा आहे. दोषींना फाशी व्हावी.”
आरोपीने २५ जून रोजी कोलकाता येथील साउथ कलकत्ता लॉ कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. आरोपी मनोजित मिश्राने पीडितेला लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, जो पीडितेने नाकारला, असा आरोप आहे. त्यानंतर त्याने पीडितेवर बलात्कार केला. २६ जून रोजी या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली. तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
पुरी रथयात्रा चेंगराचेंगरी: दोन अधिकारी निलंबित, डीएम-एसपींची बदली!
वीजदरात कपात करून दिला महाराष्ट्रातील वीजग्राहकांना दिलासा
कोलकाता बलात्कार प्रकरणी तृणमूल काँग्रेसमध्येच खडाजंगी
‘सरदारजी ३’ वाद: दिलजीत दोसांझच्या समर्थनार्थ भाजपा नेते मैदानात!
दरम्यान, आरोपी बद्दल अनेक माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार , लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, आरोपीने कॅम्पसमधील अनेक मुलींना लक्ष केले होते. तो मुलींचे फोटो एडिट करून ते त्याच्या मित्रांमध्ये व्हायरल करत असे.
एका विद्यार्थ्याने सांगितले की तो त्याच्या मित्रांना महाविद्यालयीन मुलींचे खाजगी फोटो दाखवत असे. आरोपी मुलींसोबत घालवलेल्या खाजगी क्षणांचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड करत असे. या फोटो आणि व्हिडिओंद्वारे तो मुलींची बदनामी करत असे. असेही उघड झाले कि आरोपी कॉलेजच्या मुलींना ‘तुई आमाय बिये कोरबी’ म्हणजेच ‘तुम्ही माझ्याशी लग्न करशील का?’ असे विचारत असे. अहवालात असेही उघड झाले आहे की त्याने कॉलेजमध्ये इतकी भीती पसरवली होती की तिथले शिक्षकही त्याला घाबरत होते.
