28.1 C
Mumbai
Friday, August 14, 2026
घरविशेष‘टिप द्या, राइड मिळवा’चा फंडा बंद; केंद्राचा उबर-ओलासह सर्व ऍप्सना आदेश

‘टिप द्या, राइड मिळवा’चा फंडा बंद; केंद्राचा उबर-ओलासह सर्व ऍप्सना आदेश

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा निर्णय

Google News Follow

Related

कॅब बुक करताना प्रवाशांना आधीच ‘टिप’ देण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या सुविधा आता बंद होणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने उबर, ओला आणि इतर कॅब ऍग्रीगेटर्सना प्रवास सुरू होण्यापूर्वी टिप मागणारे किंवा त्यासाठी प्रवाशांना प्रवृत्त करणारे पर्याय तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारने हा निर्णय मोटर व्हेईकल ऍग्रीगेटर्स गाईडलाईन्स, २०२५ मधील तरतुदींच्या आधारे घेतला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवाशाला चालकाला स्वेच्छेने टिप देण्याची सुविधा देता येते; मात्र ही सुविधा प्रवास पूर्ण झाल्यानंतरच उपलब्ध असावी. बुकिंगच्या वेळी, प्रवास सुरू होण्यापूर्वी किंवा प्रवासादरम्यान टिप देण्याचा पर्याय उपलब्ध करून देता येणार नाही.

कॅब बुक करताना अतिरिक्त पैसे दिल्यास चालक राइड लवकर स्वीकारेल, बुकिंगची पुष्टी वेगाने होईल, चांगली सेवा मिळेल किंवा प्रतीक्षा वेळ कमी होईल, असा कोणताही आभास निर्माण करू नये, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांवर अतिरिक्त पैसे देण्याचा दबाव निर्माण करणाऱ्या ऍपमधील सूचना आणि पर्याय हटवावे लागणार आहेत.

सरकारच्या निर्णयामुळे चालकांना मिळणारी टिप बंद होणार नाही. प्रवास पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना चालकाला स्वेच्छेने टिप देण्याची सुविधा कायम राहणार आहे. विशेष म्हणजे, प्रवाशाने दिलेली संपूर्ण टिप रक्कम चालकाला मिळणे अपेक्षित आहे; ऍग्रीगेटरकडून त्यातून कोणतीही कपात करता येणार नाही.

हे ही वाचा:

उत्तराखंडच्या चमोलीत जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दुर्घटना; ७ कामगारांचा मृत्यू

एअर इंडियाच्या सर्व वैमानिकांसाठी डोप टेस्ट अनिवार्य

नांदेडमध्ये अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंह बादल यांच्यावर हल्ला

बांगलादेश अंधारात! १० तास लोडशेडिंग, ८ वाजताच दुकानं बंद

रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व मोटार वाहन अ‍ॅग्रीगेटर्सना त्यांच्या मोबाइल अ‍ॅप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा आढावा घेऊन २०२५ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक बदल तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांशी विसंगत असलेली कोणतीही सुविधा किंवा इंटरफेस विलंब न करता बदलण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे कॅब बुक करताना ‘ऍडव्हान्स टिप’ देऊन राइड मिळण्याची शक्यता वाढवण्याची पद्धत थांबणार आहे. प्रवाशांना आधी अतिरिक्त पैसे देण्याची गरज राहणार नाही आणि चालकाच्या सेवेनंतरच टिप देण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा