26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरविशेष'अंतिम'तः सलमानचा अ'सरदार' अवतार

‘अंतिम’तः सलमानचा अ’सरदार’ अवतार

Related

बॉलीवूडचा भाई सलमान खानचा बहुचर्चित ‘अंतिम – द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट येत्या २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर त्याच्या एक महिना अगोदर म्हणजे सोमवार २५ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये आयुष शर्मा आणि सलमान खान हे दोघे मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट २०१८ चा मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ चा हिंदी रिमेक आहे.

या चित्रपटाची निर्माती सलमान खाननेच केली आहे. या चित्रपटात सलमान खान हा एका अनोख्या अंदाजात पहायला मिळणार आहे. सलमान खान या चित्रपटात एका दबंग सिख कॉपच्या अर्थात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आयुष शर्मा हा एका गँगस्टरच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सलमान खानचा असरदार अवतार पाहायला मिळणार आहे. कारण या आधी रेस ३, भारत, दबंग ३, राधेने प्रेक्षकांची चांगलीच निराशा केली होती.

या चित्रपटामध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्यातील संघर्ष पहायला मिळणार आहे. या चित्रपटाला रवी बसरूर आणि हितेश मोडक यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून जगभर प्रदर्शित केला जाणार आहे. सुरूवातीला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होता. पण आता महाराष्ट्रारातील चित्रपटगृह खुली करण्यात आल्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करायचा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा:

हा ढोंगीपणा का? सगळं ज्ञान दिवाळीलाच का आठवतं

नवाब मलिक माझ्या मृत आईवर हल्ले करत आहेत

मला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, वानखेडे यांनी लिहिले पत्र

… म्हणून त्याने मारली राज्यपालांच्या कानशिलात!

सोमवार, २५ ऑक्टोबर रोजी आणखीन दोन हिंदी चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत. यशराज फिल्म्सचा ‘बंटी और बबली २’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’. सत्यमेव जयते २ हा चित्रपट सलमान खानच्या ‘अंतिम’ च्या एक दिवस आधी म्हणजेच २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची पसंती नक्की कोणत्या चित्रपटाला मिळणार आणि बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट ‘सुपरहिट’ चा टॅग घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा