27 C
Mumbai
Thursday, April 2, 2026
घरविशेषपोलीस महासंचालक कार्यालयात दुर्घटना; झाडाची फांदी पडून पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्याचा मृत्यू

पोलीस महासंचालक कार्यालयात दुर्घटना; झाडाची फांदी पडून पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्याचा मृत्यू

कुलाबा पोलीस ठाण्यात 'अपघाती मृत्यू' नोंद

Google News Follow

Related

दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात असलेल्या महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाच्या (DGP Office) परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. झाडाची मोठी फांदी अंगावर पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) एका ४३ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अनिल गोरे (वय ४३) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, ते पीडब्ल्यूडी विभागात इलेक्ट्रिशन म्हणून कार्यरत होते. गुरुवारी कर्तव्यावर असताना ते पाणी पिण्यासाठी जात होते, त्याच वेळी अचानक झाडाची एक मोठी फांदी त्यांच्या अंगावर कोसळली. या घटनेत गोरे गंभीर जखमी झाले होते.
या घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाची नोंद कुलाबा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी सध्या या घटनेची ‘अपघाती मृत्यू’ (ADR) म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा