छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या राहत असलेल्या बांग्लादेशी नागरिकांविरोधात पोलिस आणि एसटीएफची संयुक्त कारवाई सुरू आहे. दुर्ग पोलिसांनी सुपेला येथील कॉन्ट्रॅक्टर कॉलनीतून एका बांग्लादेशी महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे. चार दिवसांत एसटीएफची ही दुसरी मोठी कारवाई आहे. चौकशीत महिलेनं आपलं नाव ज्योती आणि पुरुषाने रासेल शेख असल्याचं सांगितलं. मात्र दस्तऐवज तपासणी दरम्यान स्पष्ट झालं की, महिलेनं आपली खरी ओळख शाहीदा खातून (३५ वर्षे) सांगितली असून ती बांग्लादेशाची नागरिक आहे.
एसपी विजय अग्रवाल यांनी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाली होती की कॉन्ट्रॅक्टर कॉलनीत एक महिला व पुरुष बनावट ओळख वापरून राहत आहेत. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकून दोघांना ताब्यात घेतलं. तपासात उघड झालं की, शाहीदा खातून हिनं २०१७ मध्ये बांग्लादेशच्या मोहम्मद रासेलशी विवाह केला होता. त्यानंतर दोघं पासपोर्ट आणि व्हिसाच्या माध्यमातून भारतात आले होते. महिलेचा व्हिसा १३ सप्टेंबर २०१८ रोजी, तर रासेलचा व्हिसा १२ एप्रिल २०२० रोजी संपला होता, तरीही ते दोघं भारतामध्ये बेकायदेशीररीत्या राहात होते.
हेही वाचा..
किम जोंग उन यांनी एअर डिव्हिजनच्या युद्धसरावात घेतला सहभाग
सरन्यायाधीशांना आर्किटेक्ट व्हायचं होतं !
ब्रिक्सच्या ऊर्जा मंत्र्यांच्या बैठकीत भारत कामगिरी मांडणार
रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ मिळाल्यावर राजेंद्र शुक्ल काय म्हणाले ?
एसटीएफला माहिती मिळाली आहे की शाहीदाने भारतात राहून बनावट कागदपत्रे तयार केली होती. तिनं ‘ज्योती’ या बनावट नावाने आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्टसुद्धा मिळवले होते. ती भिलाईमध्ये भाड्याच्या घरात राहत होती आणि व्हॉट्सअॅप व इंटरनेट कॉलच्या माध्यमातून बांग्लादेशातील कुटुंबाशी संपर्कात होती. पोलिस तपासात हेही समोर आले की, शाहीदा २००९ मध्येही बेकायदेशीररीत्या भारतात आली होती. ती बांग्लादेश-भारत आंतरराष्ट्रीय सीमेवरून पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात शिरली होती. तिथून हावडामार्गे मुंबई गाठली आणि मजुरी करू लागली. तेव्हा तिची मोहम्मद रासेलशी ओळख झाली. दोघं नंतर पश्चिम बंगालला परतले आणि विवाह केला, त्यानंतर ते बांग्लादेशला परत गेले आणि २०१७ मध्ये पासपोर्ट-व्हिसाद्वारे भारतात पुन्हा आले, पण त्यानंतर परत गेलेच नाहीत.
पोलिसांच्या माहितीनुसार मोहम्मद रासेल याच्यावर याआधी लुटीचा गुन्हा नोंदवलेला आहे. सद्यस्थितीत पोलिसांनी विदेशी कायदा व बनावट कागदपत्र तयार करण्याच्या आरोपाखाली दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.







