पुणे ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलीस अलर्ट मोडवर आली असून आतापर्यंत आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सात अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी गुन्हे शाखेच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
गुन्हे पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. दोन बीट मार्शलांना काल निलंबित करण्यात आले होते. यानंतर दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करत निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून सात जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
नीट परीक्षा घोटाळा लातूर कनेक्शन, चौघांना अटक!
पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ!
जरांगे म्हणतायत, मुस्लिमांना आरक्षण द्या, नाहीतर बघून घेतो!
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला, सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा!
दरम्यान, पुण्यातील एफसी रोडवरील असलेले एल-३ नामक हॉटेल सध्या पोलिसांकडून आणि राज्य उत्पादन विभागाकडून सील करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हॉटेल मधील सीसीटीव्हीच्या आधारे शनिवारी (२२ जून) झालेल्या पार्टीमधील तरुणांना चौकशी करिता बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.