एका नव्या संशोधनानुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स – जसं की प्रोसेस्ड मांसाहार, साखरयुक्त पेये आणि ट्रान्स-फॅटी अॅसिड – यांचं अगदी कमी प्रमाणात आणि नियमितपणे सेवन केल्यासही डायबेटीस, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनच्या संशोधकांनी नेचर मेडिसिन या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या आपल्या अभ्यासात सांगितले की, रोज ०.६ ग्रॅम ते ५७ ग्रॅम प्रोसेस्ड मीट खाल्ल्यास टाइप २ डायबेटीसचा धोका किमान ११% पर्यंत वाढतो. तर, ०.७८ ग्रॅम ते ५५ ग्रॅम दररोज सेवन केल्यास कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका ७% वाढतो.
याशिवाय, रोज ५० ग्रॅम प्रोसेस्ड मीट खाल्ल्यास इस्केमिक हार्ट डिजीज (IHD) – म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा अडथळलेला असतो – याचा धोका १५% पर्यंत वाढतो. साखरयुक्त शीतपेयांचे दररोज १.५ ग्रॅम ते ३९० ग्रॅम सेवन केल्यास टाइप २ डायबेटीसचा धोका ८ % आणि हृदयरोगाचा धोका २ % वाढतो, असंही संशोधकांनी सांगितलं. म्हणजेच अगदी थोडी मात्रा – रोज एक सर्विंग किंवा त्यापेक्षाही कमी – घेतल्यास धोका झपाट्याने वाढतो. या अभ्यासात स्पष्टपणे दाखवून दिलं आहे की, प्रोसेस्ड मीट (जसं की पॅकबंद मांस), साखरयुक्त पेय, आणि ट्रान्स फॅट्स असलेले पदार्थ यांचे सेवन कमीत कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. संशोधकांनी सुचवलं आहे की अशा अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नपदार्थांसाठी एक एकत्रित आणि काळजीपूर्वक आरोग्य तपासणीचं धोरण तयार करणं गरजेचं आहे.
हेही वाचा..
छांगुर बाबा प्रकरणात ईडीकडून तपास
फरार मोनिका कपूरला अमेरिकेतून भारतात आणले
आयपीएस अधिकारी सांगून फसवणूक करणारा भामटा अटकेत
पंतप्रधान मोदींचा ब्राझीलच्या सर्वोच्च सन्मानाने गौरव
निष्कर्षातून हे समोर आलं आहे की, या अन्नपदार्थांचं कितीही प्रमाणात सेवन केलं, तरी धोका वाढतोच, आणि विशेषतः जेव्हा आपण त्यांचं सेवन थोड्याथोडक्या प्रमाणात नियमित करतो, तेव्हा हा धोका अधिक गतीने वाढतो. पूर्वीच्या अनेक संशोधनांमध्येही हे दर्शवण्यात आलं आहे की अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नपदार्थ, विशेषतः प्रोसेस्ड मीट, साखरयुक्त पेये आणि ट्रान्स फॅटी अॅसिड्स, यांचा दिर्घकालीन आजारांशी स्पष्ट संबंध आहे.
अंदाजानुसार, २०२१ मध्ये संपूर्ण जगभरात सुमारे ३ लाख लोकांचा मृत्यू केवळ प्रोसेस्ड मीटयुक्त आहारामुळे झाला, तर साखरयुक्त पेय व ट्रान्स फॅट्सने भरलेल्या आहारामुळे लाखो लोकांना शारीरिक अक्षमतेचा सामना करावा लागला. संशोधकांनी स्पष्टपणे सल्ला दिला आहे की, प्रोसेस्ड मीट, साखरयुक्त पेय आणि ट्रान्स फॅटी अॅसिड्सचं सेवन शक्य तितकं टाळावं. संशोधकांनी हेही सांगितलं की, प्रोसेस्ड मीट सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर स्मोकिंग, क्यूरिंग किंवा रासायनिक प्रक्रिया केली जाते, ज्यामध्ये अनेक वेळा एन-नायट्रोसो एजंट्स, पॉलीसायक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन, आणि हेटेरोसायक्लिक अमाइन्स हे घटक आढळतात – हे सर्व घटक ट्यूमर (गांठ) वाढण्यास कारणीभूत ठरतात.







