30 C
Mumbai
Wednesday, March 18, 2026
घरविशेषमाधुरी हत्तीणीच्या परतीसाठी वनताराचा पूर्ण पाठिंबा!

माधुरी हत्तीणीच्या परतीसाठी वनताराचा पूर्ण पाठिंबा!

Google News Follow

Related

गुजरातमधील प्राणी बचाव केंद्र, वनताराने बुधवारी (६ ऑगस्ट ) सांगितले की, ३६ वर्षीय माधुरीला तिच्या मूळ घरी कोल्हापूरला परत आणण्यासाठी आमचा पूर्णपणे पाठींबा आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला त्यांच्या पूर्वीच्या आदेशाचा आढावा घेण्यासाठी आणि हत्तीला परत येण्यास परवानगी देण्यासाठी विनंती करण्याची योजना जाहीर केल्यानंतर हे घडले.

पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) च्या याचिकेवर आधारित मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, गेल्या महिन्यात महादेवी म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या माधुरी हत्तीणीला कोल्हापूरच्या नांदणी मठातून  जामनगरमधील वनतारा येथे हलवण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. कोर्टाच्या या निर्णयानंतर कोल्हापूरमध्ये जनतेचा रोष आणि निषेध पहायला मिळाला. यानंतर जनतेने नाराजी व्यक्त करत आंदोलन सुरु केले. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी विविध पक्षाने नेते देखील पुढे आले. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक पार पडली.

यावेळी राज्य सरकार नांदणी मठासोबत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. महादेवी हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचे पथक तयार करण्यात येणार आहे आणि महादेवी हत्तीणी परत आली पाहिजे हीच सर्वांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

ITBP, NDRF ने अडकलेल्या ४१३ तीर्थयात्रेकरूंना वाचवले

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘कर्तव्य भवन’चे उद्घाटन

हमीरपूर डिव्हिजनला आतापर्यंत २११ कोटींचे नुकसान

सुवेंदु अधिकारींसोबत मोठी दुर्घटना घडली असती…

 

याच दरम्यान, वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मुख्यमंत्र्यांची आज बैठक पार पडली. माधुरी हत्तीणीच्या परतीसाठी वनताराचा पूर्ण पाठिंबा असल्याचे वनताराच्या अधिकार्‍यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस ट्वीटकरत म्हणाले, वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.

या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा