गुजरातचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले विजय रुपाणी यांचे अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात निधन झाले. ते त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. याच दरम्यान, त्यांच्या लंडन दौऱ्यावरून एक माहिती समोर आली आहे. विजय रुपाणी यांनी आठवड्यापूर्वी लंडनला जाण्याचा विचार केला होता. परंतु नंतर निवडणूक प्रचारामुळे त्यांना काही दिवसांसाठी हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय रुपाणी हे यापूर्वी ५ जून रोजी त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जाणार होते. त्यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत जाणार होत्या. परंतु रुपाणी यांना लुधियाना पश्चिम पोटनिवडणुकीच्या निवडणूक प्रचारामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलावा लागला. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, प्रदेश पक्षप्रमुख सुनील जाखड म्हणाले की, त्यांच्या पत्नी ५ जून रोजी लंडनला रवाना झाल्या. पण ते तिथेच थांबले आणि नंतर त्यांनी १२ जूनची तारीख निश्चित केली परंतु त्यांचा प्रवास कधीच पूर्ण होऊ शकला नाही.
हे ही वाचा :
मारक्रमच्या पराक्रमाने दक्षिण आफ्रिकेला पहिलं ICC विश्वविजेतेपद!
अयोध्येच्या सुरक्षेसाठी हजार सीसीटीव्ही कॅमेरे
पुतीन यांची इच्छा, ट्रम्प यांची करणी भारत-चीन यांची हातमिळवणी
कोण लोकशाहीत ‘राजा’ बनण्याचा प्रयत्न करतोय
१२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले आणि विजय रुपाणी यांचा त्यामध्ये मृत्यू झाला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे चुलत भाऊ विपुल यांना त्यांच्या भावाच्या निधनाची माहिती एका कुटुंबातील सदस्याने सोशल मीडिया ग्रुपवर केलेल्या पोस्टद्वारे मिळाली. “मी एक पालक गमावला आहे जो कोलकातामध्ये माझ्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या बाजूने सुख-दुःखात उभा राहिला,” असे विपुल यांनी शुक्रवारी (१३ जून) सांगितले. दरम्यान, अपघातातील मृतांची संख्या २७० वर पोहोचली आहे. मृतांमध्ये मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात जखमी झालेल्यांचा समावेश आहे.







