29 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
घरविशेषविराट कोहलीचे टी-२० क्रिकेटमधील १०० वे अर्धशतक

विराट कोहलीचे टी-२० क्रिकेटमधील १०० वे अर्धशतक

हा विक्रम नोंदवणारा कोहली ठरला पहिला आशियाई क्रिकेटपटू

Google News Follow

Related

विराट कोहलीने टी-२० कारकिर्दीतील १०० वे अर्धशतक झळकावले आहे. आयपीएल २०२४ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने हा विक्रम केला आहे. टी-२० मध्ये १०० अर्धशतके झळकावणारा कोहली आशियातील पहिला खेळाडू ठरला आहे. टी-२० मध्ये १००व्यांदा ५० धावांचा टप्पा ओलांडणारा कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वीच्या चेन्नईविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात कोहलीने टी-२० मध्ये १२ हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.

आता कोहलीने टी-२० मध्ये १०० व्यांदा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. चिन्नास्वामी येथे पंजाबविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात कोहलीने आयपीएलमधील आपले ५१ वे अर्धशतक झळकावले. याशिवाय त्याने स्पर्धेत ७ शतकेही झळकावली आहेत. कोहलीने पंजाबविरुद्ध ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

कोहलीने आतापर्यंत एकूण ३७७ टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ३६० डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ४१.१४ च्या सरासरीने आणि १३३.३६ च्या स्ट्राईक रेटने १२,०१५ धावा केल्या आहेत. यात ८ शतके आणि ९१ अर्धशतके मारली आहेत. ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १२२ आहे.

हेही वाचा :

आशियातील अब्जाधीशांच्या यादीत मुंबई नंबर वन

पंजाबमध्ये अकाली नको; भाजपा ‘अकेला’ करणार वाटचाल

धाराशिवमध्ये दोन गटात राडा; १२५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल

“भारत माता की जय, जय हिंद हे नारे रचणारे मुस्लीम होते”

पंजाबचे १७७ धावांचे लक्ष्य


चिन्नास्वामी मैदानावरील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. फलंदाजीसाठी पंजाबने २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या. कर्णधार शिखर धवनने संघासाठी ३७ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. ज्यात ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. याशिवाय सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शशांकने ८ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २१ धावा केल्या आणि संघाला १७० धावांचा टप्पा ओलांडण्यात मोलाचे योगदान दिले. आरसीबीकडून सिराज आणि मॅक्सवेलने २-२ विकेट्स घेतल्या.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
146,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा