29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
घरविशेषविवो आयपीएल आता टाटा आयपीएल

विवो आयपीएल आता टाटा आयपीएल

Google News Follow

Related

इंडियन प्रीमियर लीगच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी ४४० कोटींचा करार करणाऱ्या विवोने आता या प्रायोजकत्वामधून माघार घेतली असून आता टाटाकडे ही सूत्रे आली आहेत, अशी भारतीय क्रिकेट बोर्डाने घोषणा केली आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने हा निर्णय घेतला आहे. या कौन्सिलच्या बैठकीनंतर आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी टाटा उद्योगसमुह आता आयपीएलचे टायटल स्पॉन्सर असतील असे म्हटले आहे.

पटेल यांनी यावेळी असेही जाहीर केले की, सीव्हीसी कॅपिटल यांना अहमदाबाद फ्रँचाइझीसाठी प्रस्ताव दिला आहे. गेले काही महिने या फ्रँचाइझीची चर्चा सुरू आहे.

आयपीएलशी विवोचा दोन वर्षांचा करार शिल्लक होता. २०१८मध्ये हा करार विवोने केला होता. पण २०२०मध्ये चिनी मोबाईल फोनच्या या कंपनीने हा करार थांबवला. त्यानंतर हा करार ड्रीम ११ यांच्याकडे आला. खरेतर पाच वर्षांचा हा करार २०२०च्या हंगामापर्यंत होता. पण एक वर्षाचे अंतर पडल्यामुळे ते २०२३पर्यंत वाढविण्यात आला. आता गव्हर्निंग कौन्सिलने निर्णय घेतला आहे की, २०२२ आणि २०२३ या हंगामांसाठी टाटा हे प्रायोजक असतील. त्यामुळे आता या कालावधीत टाटा आयपीएल असे या स्पर्धेचे नाव असेल.

हे ही वाचा:

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विकृत लिखाण करणाऱ्याला ठाणे भाजपा महिला मोर्चाचा चोप

मोलनुपिरावीर उपयुक्त की धोकादायक?

‘दरवाजे ठोठावत बसण्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांची भेट घ्या’

 

अहमदाबाद फ्रँचाइझीसाठी सीव्हीसी कॅपिटलला विचारणा झाली आहे. आता आयपीएलचा भव्य लिलाव १२ व १३ फेब्रुवारीला होईल, असेही गव्हर्निंग कौन्सिलमध्ये ठरले आहे. पण दोन नव्या संघांना आपले खेळाडू निवडण्यासाठी किती वेळ दिला जाईल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. लखनौ आणि अहमदाबाद असे दोन नवे फ्रँचाइझी यात असतील.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा