30 C
Mumbai
Wednesday, July 17, 2024
घरविशेष‘या’ दिवशी ७५ रुपयांत बघा कुठलाही सिनेमा

‘या’ दिवशी ७५ रुपयांत बघा कुठलाही सिनेमा

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने मोठी घोषणा केली आहे.

Google News Follow

Related

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने मोठी घोषणा केली आहे. १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन आहे. या दिवसासाठी मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने विशेष ऑफर दिली आहे.

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी फक्त ७५ रुपये मोजावे लागणार आहेत. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या निर्णयानंतर आता चित्रपट गृहात ७५ रुपयांत चित्रपट पाहता येणार आहे. पीव्हीआर, सिनेपोलिस यांसह देशातील ४ हजार चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात येणार आहे.

यावर्षी पहिल्यांदाच देशात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे जवळपास दोन वर्षे चित्रपटगृह बंद होते. चित्रपटांचा व्यवसाय पुन्हा एकदा सुरू झाल्याने त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जाणार आहे.

कोरोना काळ, लॉकडाऊन आणि सध्या सुरू असलेला बॉलीवूड बॉयकॉट ट्रेंड यामुळे चित्रपटगृहांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. आता देण्यात आलेल्या ऑफरमुळे या व्यवसायाला काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

 

१४ हजार ५०० शाळांसाठी ‘पीएम श्री स्कुल्स’ स्मार्ट योजनेची घोषणा

दोन दशकानंतर पाकिस्तानने दहशतवाद्याचा मृतदेह स्वीकारला

लिज ट्रस लवकरच घेणार ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ

अमेरिकेतही ३ सप्टेंबर रोजी अशा पद्धतीची ऑफर देण्यात आली होती. या दिवशी चित्रपटाच्या तिकिटांची किंमत फक्त ३ डॉलर होती. एरव्ही ही किंमत जवळपास ९ डॉलर्स इतकी असते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा