पश्चिम बंगाल: सरस्वती पूजे दरम्यान अनेक ठिकाणी मूर्तींची तोडफोड!

भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांची सरकारवर टीका

पश्चिम बंगाल: सरस्वती पूजे दरम्यान अनेक ठिकाणी मूर्तींची तोडफोड!

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी (३ फेब्रुवारी) अनेक ठिकाणी सरस्वती पूजे दरम्यान व्यत्यय आणण्यात आला तर काही ठिकाणी पोलिस संरक्षणात पूजा पार पडली. नादिया जिल्ह्यातील छपरा येथील कलिंगा भागात देवी सरस्वतीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. एका विशिष्ट समुदायाच्या लोकांवर मूर्ती तोडल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.

बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर येथील शाळेत सरस्वती पूजा करण्यात येणार होती. मात्र, एका विशिष्ट समुदायाच्या आक्षेपामुळे पूजा रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या पालकांनी याचा तीव्र निषेध केला. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) तैनात करावे लागले. त्याचप्रमाणे, हुगळी जिल्ह्यातील बलाई बेडिया येथील एका शाळेत एका विशिष्ट समुदायाच्या लोकांच्या आक्षेपामुळे सरस्वती पूजा थांबवण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नादिया जिल्ह्यातील हरींगहाटा येथील प्राथमिक शाळेत सरस्वती पूजा आयोजित करू नये अशी धमकी देण्यात आली होती. तृणमूलचे बूथ अध्यक्ष अलिमुद्दीन मंडल यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. तथापि, स्थानिक लोकांच्या प्रचंड विरोधानंतर येथे पूजा आयोजित करण्यात आली.
हे ही वाचा : 
खिचडी घोटाळा प्रकरणातील आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती सूरज चव्हाणांना जामीन मंजूर
पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभाला देणार भेट, संगमात करणार स्नान!
मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
अमेरिकेत बेकायदेशीपणे राहणारे भारतीय स्थलांतरित लष्कराच्या विमानाने भारताकडे रवाना
मूर्तीची तोडफोड झालेले फोटो व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, शोध सुरु असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पोलिसांच्या देखरेखीखाली पूजा आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये पोलिसांच्या देखरेखीखाली सरस्वती पूजा पार पडली, ज्यात पूर्व मेदिनीपूरमधील नंदीग्राममधील मुस्लिमबहुल भागात असलेले महाविद्यालय आणि हावडामधील उलुबेरिया येथील शाळेचा समावेश आहे.
मूर्तीच्या तोडफोड प्रकरणी बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी म्हटले की, बंगालमधील मुस्लिम सरस्वती पूजेमध्ये अडथळे निर्माण करत आहेत. हा हिंदू श्रद्धेवर थेट हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी बंगालला बांगलादेश बनवले आहे.
Exit mobile version