पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारी रोजी प्रयागराज महाकुंभाला भेट देणार आहेत. बुधवारी (५ फेब्रुवारी) माघ महिन्याच्या अष्टमी तिथीला, शुभ मुहूर्तावर पंतप्रधान मोदी पवित्र संगमात स्नान करतील. पंतप्रधान मोदी स्नानानंतर संगमच्या काठावर गंगेची पूजा करतील आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतील. पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती समोर आली आहे.
महाकुंभ नगरमध्ये पंतप्रधान मोदींचा सुमारे एक तासाचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. बुधवारी सकाळी १० वाजता ते विशेष विमानाने बामरौली विमानतळावर पोहोचतील. यानंतर, तीन लष्करी हेलिकॉप्टर अरेलमधील डीपीएस ग्राउंडच्या हेलिपॅडवर उतरतील, तेथून ते कारने व्हीआयपी जेट्टीवर जातील. येथून निषादराज संगमात स्नान करण्यासाठी क्रूझने जातील.
हे ही वाचा :
मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
अमेरिकेत बेकायदेशीपणे राहणारे भारतीय स्थलांतरित लष्कराच्या विमानाने भारताकडे रवाना
ठरलं! पंतप्रधान मोदी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प फेब्रुवारीमध्ये अमेरिकेत भेटणार
सहकार्य दाखवताच अतिरिक्त करामधून कॅनडा, मेक्सिकोला तात्पुरती सूट; चीनवरील १० टक्के कर लागू
यानंतर ते गंगेची पूजा आणि आरती करतील. या काळात ते आचार्यवाडा, दांडीवाडा आणि खाकचौक येथील आखाड्यांच्या प्रतिनिधींना भेटतील आणि महाकुंभात सहभागी होणाऱ्या लाखो यात्रेकरूंसाठी केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, उद्या ५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. ७० जागांसाठी हे मतदान पार पडत आहेत. ८ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे.