30.9 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरविशेषपश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ-माहीमदरम्यान मध्यरात्री जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ-माहीमदरम्यान मध्यरात्री जम्बो ब्लॉक

Google News Follow

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री म्हणजेच २८ आणि २९ नोव्हेंबरदरम्यान सांताक्रुझ ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अरुण कुमार मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अप जलद मार्गावर रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत, तर डाउन जलद मार्गावर रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. त्यामुळे या कालावधीत जलद मार्गावरील लोकलच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील सर्व लोकल अंधेरी ते चर्चगेट या स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलाची नोंद घ्यावी आणि संभाव्य विलंब लक्षात घेऊन घराबाहेर पडावे. दरम्यान, रविवार २९ नोव्हेंबर २०२६ रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दिवसा कोणताही जम्बो ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे दिवसा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा