29 C
Mumbai
Thursday, April 16, 2026
घरविशेषपाकिस्तानसारख्या भिकारी देशाची किंमत काय?, म्हणून नेते अशी विधाने करतात!

पाकिस्तानसारख्या भिकारी देशाची किंमत काय?, म्हणून नेते अशी विधाने करतात!

पंतप्रधान शरीफ यांच्या धमकीवर भाजप नेते दिलीप घोष प्रत्युत्तर

Google News Follow

Related

‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. मात्र, एवढे सगळे होवूनही पाकिस्तान सुधारण्याच्या मार्गावर दिसत नाहीये. एकीकडे भारतासोबत शांततेसाठी हात मिळवणी करण्यास तयार असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे भारताला धमक्या द्यायचं. सिंधू करार रद्द झाल्यापासून पाक कोरडा पडलाय आणि त्यामुळे भारताला धमकावण्याचे काम केले जात आहे.

मात्र, भारताने पहिलाच स्पष्ट केले आहे कि अशा फुसक्या धमक्यांना भारत घाबरत नाही. दरम्यान, पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. भारताला पाकिस्तानच्या पाण्याचा एकही थेंब हिरावून घेवू दिला जाणार नाही, असे शरीफ यांनी म्हटले आहे. जर तसा प्रयत्न केला तर भारताला धडा शिकविला जाईल, अशी धमकी शरीफ यांनी दिली आहे. दरम्यान, शरीफ यांच्या धमकीला भाजप नेते दिलीप घोष यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानसारख्या भिकारी देशाला काहीही किंमत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एका कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान शरीफ म्हणाले, “आज मी शत्रूला सांगू इच्छितो की जर तुम्ही आमचे पाणी थांबवण्याची धमकी दिली तर हे लक्षात ठेवा की तुम्ही पाकिस्तानच्या पाण्याचा एक थेंबही हिसकावू शकत नाही.” जर भारताने अशी कोणतीही कृती केली तर “तुम्हाला पुन्हा असा धडा शिकवला जाईल आणि त्यामुळे तुम्हाला पश्चात्ताप होईल,” अशा इशारा शरीफ यांनी दिला.

हे ही वाचा : 

सोनिया गांधी भारतीय नागरिक होण्यापूर्वीच येथे मतदार बनल्या

बिहार निवडणूक : काँग्रेसकडून खोटे आरोप

बेटिंग अॅप प्रमोशन प्रकरण : निर्माता मंचू लक्ष्मी प्रसन्ना ईडी समोर

रिझर्व्ह बँक चौथ्या तिमाहीत रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सने कपात करू शकते

दरम्यान, या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते दिलीप घोष म्हणाले, “पाकिस्तानकडे आता काहीच उरलेले नाही. पूर्वी चीन भारताविरोधात पाकिस्तानला साथ द्यायचा, पण आता चीन भारताशी हात मिळवत आहे… पाकिस्तानसारख्या भिकारी देशाला कुठलीही किंमत उरलेली नाही, म्हणूनच तिथले नेते अशा प्रकारची वक्तव्यं करत आहेत. पाकिस्तानमध्ये लोकांना अन्न, आरोग्यसेवा किंवा नोकऱ्याही उपलब्ध नाहीत. लोक देश सोडून पळून जात आहेत. तिथे फक्त दहशतवादीच उरतील.”

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा