30 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेषमाझ्या पुतण्याला भेटायला काय हरकत आहे?

माझ्या पुतण्याला भेटायला काय हरकत आहे?

शरद पवारांनी अजित पवारांसोबतच्या भेटीवर व्यक्त केली प्रतिक्रिया

Google News Follow

Related

अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय? असं शरद पवारांनी म्हटलं आहे. अजित पवार हा माझा पुतण्या आहे आणि पवार कुटुंबातील वडिलधारा माणूस मी आहे, त्यामुळे मला कुणी भेटायला आलं किंवा मी कुणाला भेटायला बोलावलं, हा चर्चेचा विषय बनू शकत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. माझ्यातील आणि अजित पवार यांच्यातील बैठक गुप्त नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नुकत्याच झालेल्या शरद पवारांच्या पुतण्या अजित यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, शरद पवार यांनी रविवारी सांगितले की, “तो माझा पुतण्या आहे, हे मी तुम्हाला एक सत्य सांगू इच्छितो. माझ्या पुतण्याला भेटण्यात गैर काय आहे? कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा असेल, तर त्यात काही हरकत नसावी, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी पक्ष कधीच भाजपसोबत जाणार नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने शरद पवारांनी दिलं आहे. राष्ट्रवादीतील एक गट भाजपमध्ये गेला असला तरी मूळ पक्ष भाजपसोबत जाणार नसल्याचं यावेळी शरद पवार म्हणाले. काही “हितचिंतकांनी” त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला असला तरीही त्यांचा पक्ष भाजपशी जुळवून घेणार नसल्याचे, शरद पवारांनी सांगितले.विरोधकांच्या इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

श्रीनगरमध्ये शालेय विद्यार्थी तिरंगामय !

पीएफआय षडयंत्र प्रकरणी एनआयएकडून ५ राज्यांत १४ ठिकाणी छापे!

बिबट्याची कातडी घेऊन पळणाऱ्याला श्रीनगरमध्ये केले जेरबंद

भारत-चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक!

सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर करत आहे, सामान्य जनतेला हे आवडत नसून त्याचे परिणाम भविष्यात दिसतील, असं देखील शरद पवार म्हणाले. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांना नोटिसा पाठवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचं शरद पवार म्हणाले. जनता लवकरच महाविकास आघाडीच्या हातात सत्ता देईल, असंही शरद पवार म्हणाले.

पुढील रणनीती ठरवण्यासाठी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये होणार आहे, यात पुढील रणनीतीविषयी चर्चा होणार असल्याचं शरद पवार म्हणाले. हि बैठक उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोलेंच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे. या बैठकीला ३५ ते ४० नेते उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार म्हणाले.

मणिपूरचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. संसदेतील भाषणात पंतप्रधानांनी त्यावर भाष्य केलं, परंतु जनतेच्या मुद्द्यांकडे, राष्ट्रीय प्रश्नांकडे सहनशीलतेनं पाहिले जात नसल्याचं शरद पवार म्हणाले. राज्यांचे प्रश्न गांभीर्याने घेणं गरजेचं असल्याचं पवार म्हणाले. सीमा भागातील समस्यांकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं असल्याचं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा