36 C
Mumbai
Thursday, February 29, 2024
घरविशेषशेख हसिनांकडून मुस्लिमांचे लांगुलचालन!

शेख हसिनांकडून मुस्लिमांचे लांगुलचालन!

बांग्लादेशातील हिंदूंचे भवितव्य धोक्यात?

Google News Follow

Related

बांगलादेशातील कुमिल्ला जिल्ह्यातील वकील असणाऱ्या माणिक भौमिक यांची जमीन जबरदस्तीने आवामी लीगच्या शेतकरी गटाचा नेता खुर्शीद आलमकडून घेण्यात आली. त्यांना पुन्हा त्यांची जमीन मिळावी, यासाठी अनेक संस्था सरसावल्या. मात्र सर्व अल्पसंख्य त्यांच्यासारखे सुदैवी नसतात, अनेकांना त्यांच्या जमिनीवर पाणी सोडावे लागते. सन २०२१मधील घटना एकमेव नाही. अनेक हिंदूंच्या जमिनी येथे बळकावण्यात आल्या आहेत. त्याची साधी बातमीही वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत नाही.

या आणि अल्पसंख्याकांच्या अत्याचाराच्या अन्य घटनांमुळे बांग्लादेशातील हिंदूंची संख्या घटत चालली आहे. सन १९५१मध्ये बांग्लादेशात २२ टक्के हिंदू होते, हेच प्रमाण २०२२मध्ये आठ टक्क्यांच्या खाली घसरले आहे. तर, बांग्लादेशातील मुस्लिमांची संख्या ७६ टक्क्यांवरून ९१ टक्के झाली आहे. बांग्लादेशचा राष्ट्रीय धर्म इस्लाम असला तरी सन २०११च्या सत्तास्थापनेवेळी आवामी लीगने धर्मनिरपेक्षतेला प्राधान्य दिले होते. मात्र तरीही गेल्या १५ वर्षांत बांग्लादेशातील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांत वाढ झाली आहे. आताही ७ जानेवारी रोजी बांग्लादेशात निवडणुका होणार असून इस्लामचे लांगुलचालन ही तेथील अल्पसंख्य हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असे मानले जात आहे.

‘बीइंग हिंदू इन बांग्लादेश : द अनटोल्ड स्टोरी’ चे लेखक आणि पत्रकार दीप हल्दर यांनी सन २०२४च्या निवडणुकीचा हिंदूंवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे म्हटले आहे. ‘हसिना सरकारच्या जागी कट्टरवादी आल्यास धर्मनिरपेक्षवादी बांग्लादेश या संकल्पनेला सुरुंग लागेल. हिंदूंची अवस्था आणखी बिकट होईल,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. सन २००१मध्ये खलिदा झिया यांच्या नेतृत्वाखाली बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात-ए-इस्लामी यांचे सरकार आले तेव्हा मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या कत्तली झाल्या होत्या, याची आठवण त्यांनी करून दिली.

हे ही वाचा:

केएल राहुलने भारताचा खेळ सावरला!

बीसीसीआयचा निर्णय; आयपीएल स्पॉन्सरशिपमध्ये चीनसाठी दरवाजे बंद

आता विनेश फोगाटनेही खेलरत्न, अर्जुन पुरस्कार परत करण्याचा घेतला निर्णय

महाराष्ट्रात गुंतवणूक आली पण आदित्य ठाकरेंना नाही कळली !

सन २०१८च्या निवडणुकीत शेख हसिना यांच्या आवामी लीगने ‘अल्लाह सर्वशक्तिमान’ आणि ‘अल्ला इज ग्रेट’ असे जाहीरनाम्यात नमूद केले होते. अद्याप २०२४चा जाहीरनामा पक्षाकडून प्रसिद्ध झालेला नाही. मात्र गेल्या काही वर्षांत इस्लामींचे लांगुलचालन करण्याची एकही संधी हसिना शेख यांच्या आवामी लीगने सोडली नसल्याकडे राजकीय विशेषज्ञ लक्ष वेधतात. हेफाजत-ए-इस्लाम बांगलादेश या अतिउजव्या इस्लामी गटाशी संबंध ठेवण्यापासून ते सौदी-अनुदानित मशिदी उघडण्यापर्यंत आणि मदरशांची संख्या वाढवण्यापासून ते नव्याने तयार झालेल्या मौलवींना सहकार्य करण्यापर्यंत अवामी लीग उजव्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

शेख हसिना यांचे सरकार कट्टर इस्लामिक संघटनांना निधी पुरवून अशा कट्टरवादी इस्लामी राजकारण्यांसाठी नवे राजकीय पक्ष काढत असल्याचा दावाही काही जण करतात. गेल्या काही महिन्यांत बांग्लादेशच्या निवडणूक आयोगाकडे सहा नव्या इस्लामी राजकीय पक्षांची नोंद झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळेच राजकीय भविष्याचा विचार करून शेख हसिना या पक्षाची धर्मनिरपेक्ष झूल बाजूला ठेवून मुस्लिमधार्जिण्या भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या राजकीय परिप्रेक्ष्यात धर्मनिरपेक्ष राहणे आणि धर्मनिरपेक्षविरोधी गटांचा सामना करणे कठीण जात असल्याने शेख हसिना यांच्यावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे. अवामी लीगने कट्टरवाद्यांना परिस्थिती बिघडवण्यापासून रोखले असले तरी इस्लामवाद्यांना आळा घालण्याची ताकद किंवा राजकीय इच्छाशक्ती त्यांच्याकडे नाही. यापुढे अल्पसंख्याक किंवा धर्मनिरपेक्षतेच्या जोरावर, ते समाज आणि मतदारांवरील नियंत्रण गमावू शकतात, जे त्यांना परवडणारे नाही, याकडे राजकीय विशेषज्ञ लक्ष वेधतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
132,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा