भारतीय जनता पक्षाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भारतीय निवडणूक आयोगाविरुद्धच्या “मतचोरीच्या” आरोपाबाबत औपचारिक तक्रार करण्यास सांगितले. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी असा आरोपही केला की काँग्रेसला त्यांच्या निवडणुकीतील पराभवासाठी दुसऱ्यांना दोष देण्याची सवय आहे. ते म्हणाले, “काँग्रेस पक्ष घोटाळ्यांमध्ये सहभागी आहे. ते निवडणुका हरतात. जेव्हा ते निवडणुका हरतात तेव्हा त्यांना कोणाला तरी दोष द्यावा लागतो.
ते पुढे म्हणाले, कधी ते ईव्हीएमला दोष देतात, कधी व्हीव्हीपॅटला, कधी भारतीय निवडणूक आयोगाला तर कधी ते जनतेचा गैरवापर करतात आणि तथ्यांशिवाय खोटे आरोप करतात. आणि कधीही औपचारिक तक्रार देत नाहीत,” असे भाटिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
”राहुल गांधी, मी तुम्हाला आठवण करून देतो कि भारतात कायदा असून तुमची काही तक्रार असेल तर त्यासाठी काही प्रक्रिया आहेत. तुम्हाला औपचारिक तक्रार द्यावी लागते. जेव्हा तुम्ही माध्यमांमध्ये निराधार आरोप करता आणि त्यानंतर कोणतीही संवैधानिक संस्था पुरावे मागते, तेव्हा पुरावे देण्यास नकार देता,” ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा :
दिल्लीत मुसळधार पावसात भिंत कोसळून २ मुलांसह ८ जणांचा मृत्यू!
पूर्व दिल्लीतील आनंद विहार येथील रुग्णालयात भीषण आग, एकाचा मृत्यू
आदित्य ठाकरे यांनी ‘धडक-२’ आणि गणपती विसर्जन यांच्यातील संबंध उलगडला
एम फॉर ‘मस्जिद’, एन फॉर ‘नमाज’…नर्सरी अभ्यास साहित्यावरून वाद!
दरम्यान, शुक्रवारी, राहुल गांधी यांच्या “मतचोरीच्या” आरोपांवरून केंद्र आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी झाली. भाजप नेते आणि मित्रपक्षांनी त्यांचे दावे “निराधार” असल्याचे सांगत फेटाळून लावले. तर विरोधी सदस्यांनी त्यांच्या आरोपाचे समर्थन केले आणि संसदीय चर्चेची मागणी केली.







