वारी वर्षातून एकदा असते तर नमाज दिवसातून पाच वेळा असतो!

राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ अबू आझमीवर टीका  

वारी वर्षातून एकदा असते तर नमाज दिवसातून पाच वेळा असतो!

आषाढी वारीवर वादग्रस्त टिप्पणी केल्याने सपाचे नेते अबू आझमी यांच्यावर सर्व स्तरावरून टीका केली जात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याच दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केले कि वारी वर्षातून एकदा असते तर नमाज दिवसातून पाच वेळा असतो. अबू आझमी भेटले कि त्यांना समजावून सांगेन, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले आहे.

मंत्री मुश्रीफ प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, अबू आझमीना वारकरी संप्रदाय समजलेला नाही. मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेन. ही वारी वर्षातून एकदा असते नमाज दिवसातून पाच वेळा असतो. नमाज देखील अशा ठिकाणी पढली पाहिजे कि लोकांना त्रास होता कामा नये. लाखो लोक वर्षातून वारीसाठी जात असतात. त्यासाठी सरकारने नवे पालखी मार्ग तयार केले आहेत. अबू आझमी भेटले कि मी त्यांना समजावून सांगेन.

दरम्यान, आझमी यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, आझमी हे नेहमीच वादग्रस्त विधाने करतात. वादग्रस्त विधाने केल्यावर प्रसिद्धी मिळते असे त्यांना वाटते. मात्र ते प्रसिद्धी देण्याच्या लायकीचे आहेत, असे मला वाटत नाही. त्यामुळेच मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा : 

तृणमूल काँग्रेसच्या विजयी रॅलीदरम्यान स्फोट, मुलीचा मृत्यू!

आणीबाणी म्हणजे पत्रकारितेची मुस्कटदाबी

अंदमान, निकोबार बेटांचा विकास का महत्त्वाचा?

दमास्कसमधील सेंट इलियास चर्चमध्ये आत्मघातकी हल्ला, २२ जणांचा मृत्यू!

आझमी काय म्हणाले?

सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना अबू आझमी म्हणाले, “मी कोणाचीही तक्रार करत नाही. आमच्या हिंदू बांधवांच्या पावलासोबत पाऊल टाकत चालत असतो. आजवर कधीही एकाही मुसलमानाने ही तक्रार केली नाही की रस्त्यावर सण का साजरे केले जातात?. पण जर कधी नमाजसाठी मशीद भरुन जाते तिथे नमाज अदा करायला जागा राहत नाही तेव्हा लोक नाईलाजाने काही मशिदींबाहेर बाहेर पाच-दहा मिनिटांसाठी नमाज पठणासाठी येतात, प्रत्येक मशीदीबाहेर नाही.

पण त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की, जर तुम्ही बाहेर रस्त्यावर नमाज पठण केले तर तुमचा पासपोर्ट आणि वाहन परवाना देखील रद्द केला जाईल. मी पुण्यावरुन येत होतो मला सांगण्यात आके की या मार्गावरुन पालखी जाणार आहे, आपण लवकर गेले पाहिजे नाहीतर रस्ता जाम होऊन जाईल. म्हणजे रस्ता बंद तर होतोय, याला आम्ही कधीही विरोध नाही केला. पण आमच्या नमाजवेळी मात्र जाणूनबुझून वाद निर्माण केले जातात. म्हणजेच या देशात मुसलमानांना त्रास दिला जात आहे.

Exit mobile version