पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात सोमवारी (२३ जून) झालेल्या बॉम्बस्फोटात एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना कालीगंज पोलिस स्टेशन हद्दीतील बरोचांडगर येथे घडली, बॉम्बस्फोटात मुलीला गंभीर दुखापत झाली, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. कालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असताना हा स्फोट झाला. तमन्ना खातून असे मुलीचे नाव असून ती चौथीच्या वर्गात शिकत होती.
“बरोचांडगर येथे झालेल्या स्फोटात एका तरुणीच्या मृत्यूने मला धक्का बसला आहे आणि खूप दुःख झाले आहे,” असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका निवेदनात म्हटले. “दुःखाच्या वेळी माझ्या प्रार्थना आणि विचार कुटुंबासोबत आहेत.” मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पोलिस दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करतील. दरम्यान, “मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आम्ही स्फोटाचे कारण शोधत आहोत,” असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
या घटनेवरून भाजपने ममता बॅनर्जी सरकारवर हल्ला चढवला आणि मतमोजणी प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या हिंसाचारासाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले. “टीएमसीचा उत्सव रक्ताने माखलेल्या हातांनी संपतो. पुन्हा एकदा,” असे भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एका तीव्र शब्दात लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले.
मालवीय यांनी आरोप केला की सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या विजयी मिरवणुकीत बॉम्ब फेकण्यात आले आणि त्यानंतर झालेल्या गोंधळात मुलीला आपला जीव गमवावा लागला. मालवीय म्हणाले,”टीएमसी हा राजकीय पक्ष नाही. तो गिधाडांचा टोळी आहे. ते रक्त सांडल्याशिवाय पोटनिवडणूकही जिंकू शकत नाहीत. ममता बॅनर्जींच्या राजवटीत विजयाची ही किंमत आहे का?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा :
आणीबाणी म्हणजे पत्रकारितेची मुस्कटदाबी
अंदमान, निकोबार बेटांचा विकास का महत्त्वाचा?
प्रयागराजमध्ये ‘येशू दरबार’च्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर!
दमास्कसमधील सेंट इलियास चर्चमध्ये आत्मघातकी हल्ला, २२ जणांचा मृत्यू!
ते आणखी एका ट्वीटमध्ये म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही. राज्याच्या गृहमंत्री ममता बॅनर्जी प्रशासक म्हणून कमालीच्या अपयशी ठरल्या आहेत. त्याहूनही वाईट म्हणजे, त्या ध्रुवीकरण करण्यासाठी आणि त्यांची मुस्लिम मतपेढी टिकवून ठेवण्यासाठी कट्टरपंथी राजकारणाला खतपाणी घालतात आणि फक्त तमन्नासारख्या निष्पाप मुलांना त्यांच्या जीवाची किंमत मोजावी लागते. हे प्रशासन नाही, हे गुन्हेगारी दुर्लक्ष आहे.
दरम्यान, या घटनेने तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार अलिफा अहमद यांच्या विजयावर पडदा टाकला. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, अलिफा अहमद यांना १,०२,७५९ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी भाजपचे आशिष घोष ५२,७१० मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर होते, तर काँग्रेसचे उमेदवार काबिल उद्दीन शेख यांना २८,३४८ मते मिळाली.
TMC’s celebration ends with blood on its hands. Again.
From TMC’s victory rally in Muslim-majority Kaliganj bypoll, bombs were hurled, and in the chaos, a little girl—Tamanna Khatun, a Class 4 student—was killed.
Let that sink in.
A child.
Murdered.
While TMC danced to the… https://t.co/AC7ghPNti2— Amit Malviya (@amitmalviya) June 23, 2025
