रविवारी (२२ जून ) गंगापूरच्या बहरिया पोलीस स्टेशन परिसरातील नेवाडा बाजारातील येशू दरबारात भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले की, हिंदूंना पैशाचे आमिष दाखवून याठिकाणी बोलाविले जाते आणि त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकले जाते.
मौईमाचे माजी जिल्हा पंचायत सदस्य अभिषेक यादव म्हणतात की, दर रविवारी येथे येशू दरबार आयोजित केला जातो. येथे येणाऱ्या लोकांना शिक्षण आणि रोजगाराचे आमिष दाखवले जाते आणि कोणताही आजार बरा करण्याचे आश्वासन दिले जाते. ते म्हणाले की, दरबारात येणाऱ्या लोकांना ख्रिश्चन धर्माचे फायदे सांगून त्यांचे धर्मांतर केले जाते.
हे ही वाचा :
दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल आता दिल्लीत!
दमास्कसमधील सेंट इलियास चर्चमध्ये आत्मघातकी हल्ला, २२ जणांचा मृत्यू!
‘समित्यांमुळे संसद, राज्य विधिमंडळे, सरकारला उत्तरदायित्वाच्या चौकटीत ठेवणे शक्य’
मुख्याध्यापक वडिलांनी दिली मुलीला ‘जीवघेणी शिक्षा’
फुलपूरचे एसीपी पंकज लवानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मौईमा पोलिस स्टेशन परिसरातील सराई सुलतानपूर येथील विवेक कुमार यांच्या तक्रारीवरून १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयोजकांमध्ये सहभागी असलेल्या ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे.”
