28.7 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरविशेषदिपके आणि कंपनीला महिला पोलिसांनी का घेतले ताब्यात?

दिपके आणि कंपनीला महिला पोलिसांनी का घेतले ताब्यात?

दिल्लीत उतरता क्षणीच झाली कारवाई

Google News Follow

दिल्ली विमानतळावर एअर इंडियाचे विमान उतरताच नाट्यमय घडामोडी घडल्या. कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) या संघटनेचे नेते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रंका हे शनिवारी विमानाने दिल्लीला पोहोचले होते. जंतर-मंतर येथे होणाऱ्या संघटनेच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते दिल्लीला आले होते. मात्र, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआय) विमान उतरल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी विमानात प्रवेश करून तिघांनाही ताब्यात घेतले.

या कारवाईतील विशेष बाब म्हणजे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी महिला पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. ही रणनीती जाणीवपूर्वक आखण्यात आली होती की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संघर्ष होण्याची शक्यता पोलिसांनी गृहीत धरली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा:

श्रेयसऐवजी शिवम दुबेला पाठवण्याची चूक भारताला महागात!

सौर वादळाचा पृथ्वीला तडाखा! भारतावर काय परिणाम?

मॅट्रिमोनियल साइटवरून मंत्रालयातील महिलेची १८ लाखांची फसवणूक

‘इन्स्पेक्टर संजय’ने मोबाईल शोधण्याच्या नावावर घातला गंडा

विमानातील आसनांच्या रांगेमधील मार्ग अरुंद असतो आणि हालचाली करण्यासाठी फारशी जागा नसते. अशा परिस्थितीत किरकोळ धक्काबुक्कीचेही मोठ्या गोंधळात रूपांतर होऊ शकते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांना तैनात करण्याचा निर्णय घेतला असावा, असे सांगितले जात आहे. काही वेळ शाब्दिक वादावादी झाली; मात्र, त्यानंतर सीजेपीच्या तिन्ही नेत्यांना कोणताही मोठा गोंधळ न होता ताब्यात घेण्यात आले.

२० जुलै रोजी घडलेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना पुढे करून केलेली ही कारवाई नियोजनपूर्वक आखलेली रणनीती असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

२० जुलैच्या घटनेची पार्श्वभूमी

परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणावरून विद्यार्थी संसदेच्या दिशेने मोर्चा काढत असताना २० जुलै रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. त्यानंतर सीजेपीने पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांवर तरुणींना मारहाण केल्याचा आरोप केला होता. या संघटनेचा दावा होता की, अवघ्या १२ वर्षांच्या मुलींच्याही डोक्याला दुखापत झाली आणि काही मुलींचे कपडे फाडण्यात आले. सीजेपीला प्रामुख्याने तरुण आणि ‘जनरेशन झेड’मधील युवकांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेताना पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांशी संघर्ष झाल्यास त्यातून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता दिल्ली पोलिसांनी लक्षात घेतली असावी.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा