28.9 C
Mumbai
Friday, October 16, 2026
घरविशेषकेजरीवालांसह ममता बॅनर्जींना पोलिसांनी घेतले ताब्यात

केजरीवालांसह ममता बॅनर्जींना पोलिसांनी घेतले ताब्यात

आंदोलनादरम्यान दिल्लीत कारवाई

Google News Follow

Related

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी दक्षिण अ‍ॅव्हेन्यू परिसरात ही कारवाई करण्यात आली. ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन, डोला सेन आणि पक्षाच्या इतर नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) जंतर-मंतर येथे आंदोलनाची हाक दिली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून (एसआयआर) विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर राजधानीत विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न केला.

ममता बॅनर्जी यांना ताब्यात घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसने या कारवाईवर आक्षेप घेतला. पक्षाच्या म्हणण्यानुसार, ममता बॅनर्जी आणि त्यांच्या खासदारांनी शांततापूर्ण आंदोलन केले; मात्र त्यांना तिथे बसण्याचीही परवानगी देण्यात आली नाही. “आम्ही घाबरत नाही. देशात काय सुरू आहे, हे सर्वांना माहीत आहे. आमचा लढा सुरूच राहील,” अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा:

‘कॉक्रोच’ना ताब्यात घेतल्यावर प्रवासी म्हणाले, स्वच्छ भारत अभियान

सौर वादळाचा पृथ्वीला तडाखा! भारतावर काय परिणाम?

कॉकरोचच्या आंदोलनापूर्वी ५० गुन्हेगारांसह ५०० जण ताब्यात

स्टारलिंकला परवानगी नाही, मस्क यांची अंबानींवर आगपाखड

अरविंद केजरीवालही पोलिसांच्या ताब्यात

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनाही दिल्ली पोलिसांनी लोधी इस्टेट परिसरातून ताब्यात घेतले. विरोधी पक्षांच्या नेत्यांवरील या कारवायांमुळे राजधानीतील राजकीय वातावरण तापले आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे आंदोलन रोखण्यासाठी राजधानीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विविध ठिकाणी बॅरिकेडिंग, तपासणी आणि प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि इतर विरोधी नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून सुरू असलेला वाद आणखी तीव्र झाला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा