28 C
Mumbai
Tuesday, March 24, 2026
घरविशेष'पीओके आपोआप भारतात येईल'

‘पीओके आपोआप भारतात येईल’

राजनाथ सिंह यांचा मोरोक्कोच्या भूमीवरून पाकिस्तानला कडक संदेश

Google News Follow

Related

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे मोरोक्कोच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय संरक्षण मंत्र्यांचा मोरोक्कोला हा पहिलाच दौरा आहे. राजनाथ सिंह टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्सच्या उत्पादन युनिटचे उद्घाटन करण्यासाठी मोरोक्कोला आले आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे युनिट आफ्रिकेतील पहिले भारतीय संरक्षण उत्पादन प्लांट आहे. ते येथे त्यांचे समकक्ष अब्देलतिफ लौधी यांच्याशी द्विपक्षीय बैठक देखील घेतील. यावेळी राजनाथ सिंह यांनी मोरोक्कोची राजधानी रबात येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.

मोरोक्कोमधील भारतीय समुदायाशी संवाद साधताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “भारताबद्दलची आपली भक्ती, आपुलकी आणि प्रेम नैसर्गिक आहे. आपण जगात कुठेही असलो तरी आपण भारतीय आहोत हे कधीही विसरू नये. भारतीय असल्याने आपल्या जबाबदाऱ्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. जर आपण मोरोक्कोमध्ये उपजीविका कमवत आहोत आणि आपल्या कुटुंबांची काळजी घेत आहोत, तर आपण त्या देशाशी — म्हणजेच मोरोक्कोशी — कोणताही विश्वासघात करू नये. हाच भारताचा संस्कार आणि वैशिष्ट्य आहे.”

मंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “पीओके आपोआपच आमचे होईल. पीओकेमध्ये मागण्या वाढू लागल्या आहेत; तुम्ही घोषणा ऐकल्या असतीलच. पाच वर्षांपूर्वी, मी काश्मीर खोऱ्यातील एका कार्यक्रमात भारतीय सैन्याला संबोधित करत होतो, तेव्हा मी म्हटले होते की आपल्याला पीओकेवर हल्ला करून ताब्यात घेण्याची गरज नाही; ते तरीही आमचे आहे; पीओके स्वतः म्हणेल, ‘मीही भारत आहे’. तो दिवस येईल.”

हे ही वाचा : 

‘जीएसटी बचत उत्सवा’नंतर काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त?

सपकाळांचा स्वप्नकाळ राहुल गांधी नव्हे; फडणवीस पंतप्रधान

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत दिले स्पष्टीकरण

दिल्लीनंतर हैदराबाद विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकीत अभाविपचा दणदणीत विजय

 

ऑप सिंदूर’ भाग २ असेल की ३

भविष्यात कोणतीही दहशतवादी कारवाई झाली, तर भारताकडून त्याला ठोस आणि निर्णायक प्रत्युत्तर दिलं जाईल, असं स्पष्ट करत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला. “भाग २ पूर्ण व्हायचा आहे की भाग ३, हे आम्ही सांगू शकत नाही. ते त्यांच्या (पाकिस्तानच्या) वर्तनावर अवलंबून आहे. जर ते दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाले तर त्यांना उत्तर मिळेल,” असे मंत्री सिंह म्हणाले. 

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा