काश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव रस्ता बंद करण्यात आल्यानंतर एका महिला पर्यटकाने लष्करी जवानांशी असभ्य भाषेत हुज्जत घातल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सदर तरुणीवर टीकेची झोड उठली आहे. व्हिडिओमध्ये एक महिला बॅरिकेड लावलेल्या रस्त्याजवळ उभी राहून सुरक्षारक्षकांना पर्यटकांना पुढे जाण्यापासून का रोखले जात आहे, असा सवाल तावातावाने करताना दिसत आहे.
वाद वाढल्यानंतर महिलेने सुरक्षा दलांवर नाराजी व्यक्त करत, सुरक्षा दल आता काश्मिरींना जसे बंदिस्त करतात तसेच पर्यटकांना “बंदिस्त” करत आहेत. यानंतर तिने, “आम्ही जेन झी आहोत. आम्ही हे सहन करणार नाही,” असे म्हटल्याचे समोर आले आहे.
समाजमाध्यमांवर या घटनेवर टीका होत असून सुरक्षाविषयक निर्बंधांना विरोध करण्यासाठी एखाद्या पिढीची ओळख कारण म्हणून पुढे केली जाऊ शकते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा:
९ महिन्यांनंतर इम्रान खान कुटुंबियांना भेटले
…म्हणून पीएम केअर फंडातून खर्च झाले फक्त ८७ लाख रु.!
बिहारमध्ये मध्यान्ह भोजनातून मीठाऐवजी वाढली डिटर्जंट पावडर
भारतीय कंपन्यांची विदेशात झेप! जुलैमध्ये गुंतवणूक १७% वाढून ५.७ अब्ज डॉलर
काश्मीरमधील सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागांमध्ये रस्ते बंद करण्याचा निर्णय नेहमीच केवळ प्रशासकीय कारणांसाठी घेतला जात नाही. सुरक्षा दलांची हालचाल, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा दौरा, सुरू असलेली कारवाई, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली माहिती किंवा स्थानिक सुरक्षेचा आढावा यानुसार काही भागांमध्ये तात्पुरते निर्बंध लागू केले जाऊ शकतात. पर्यटकांसाठी अशा प्रकारचे निर्बंध गैरसोयीचे ठरू शकतात. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने परिस्थिती धोकादायक असल्याचे आढळल्यास नागरिकांना त्या भागात जाण्यापासून रोखणे हा सुरक्षाव्यवस्थेचा भाग असतो.
A woman is arguing with the security forces for not letting her cross the cordoned-off area somewhere in J&K.
Everything else aside, what does 'we are Gen Z' even mean in this context? Is being born in a specific year range (something you had zero control over) supposed to be a… pic.twitter.com/pfC8k911Ws
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) August 19, 2026
व्हिडिओमध्ये इतर काही पर्यटकही या ठिकाणी जमा झाल्याचे दिसत आहे. महिला सुरक्षारक्षकांशी चर्चा करत असताना आजूबाजूला पर्यटकांची गर्दी वाढल्याचेही दिसते. सुरक्षा तपासणीच्या ठिकाणी अशा प्रकारे गर्दी झाल्यास सुरक्षाव्यवस्था सांभाळणाऱ्या जवानांच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो, अशीही चर्चा सोशल मीडियात झाली.
सुरक्षेच्या कारणास्तव एखादा रस्ता बंद करण्यात आला असेल, तर पर्यटकांना त्यामागील कारण विचारण्याचा आणि स्पष्टीकरण मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, सुरक्षाव्यवस्थेचे नियम लागू असताना केवळ पर्यटकांना गैरसोय होत आहे म्हणून जवानांनी सुरक्षा प्रोटोकॉल बदलणे अपेक्षित नसते, या शब्दांत लोकानी सोशल मीडियात तरुणीवर टीका केली.
‘जेन झी’लाही नियम तेच
या संपूर्ण घटनेत महिलेचे “आम्ही जनरेशन झेड आहोत” हे वक्तव्य सर्वाधिक चर्चेत आले आहे. एखाद्या विशिष्ट पिढीशी संबंधित असणे हे सुरक्षेच्या नियमांपासून सूट मिळण्याचे कारण ठरू शकत नाही. त्याचप्रमाणे पर्यटक असल्यामुळे काश्मीरमधील प्रत्येक रस्ता किंवा प्रत्येक परिसरात निर्बंधांशिवाय प्रवेश मिळेल, असेही नाही. काश्मीरमध्ये पर्यटन वाढण्यासाठी पर्यटकांना सुरक्षित आणि स्वागतार्ह वातावरण मिळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्या प्रदेशातील सुरक्षाविषयक वास्तव समजून घेणेही आवश्यक आहे, असा सूरही तिथे ऐकायला मिळाला.
