26 C
Mumbai
Sunday, March 1, 2026
घरविशेषसेमीफायनलमध्ये भारताचा प्रवेश

सेमीफायनलमध्ये भारताचा प्रवेश

झुलन गोस्वामी, मिताली राज आणि अंजुम चोप्रा यांच्याकडून अभिनंदन

Google News Follow

Related

नवी मुंबईत गुरुवारी झालेल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडवर डीएलएस नियमांनुसार ५३ धावांनी विजय मिळवत विश्वकपच्या सेमीफायनलमध्ये दमदार प्रवेश केला. या विजयाबद्दल भारताच्या माजी कर्णधार मिताली राज, अंजुम चोप्रा आणि झुलन गोस्वामी यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.

झुलन गोस्वामी यांनी सोशल मीडियावर लिहिले,
“शाब्बास भारत! स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी जबरदस्त खेळी केली. दोघींनी मिळून २१२ धावांची विक्रमी सलामी भागीदारी केली, जी महिला विश्वकपच्या इतिहासातील भारताची सर्वात मोठी भागीदारी आहे. या महत्त्वाच्या विजयामुळे भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये स्थान पक्कं केलं आहे.”

मिताली राज यांनी ‘जियोस्टार क्रिकेट लाईव्ह’वर बोलताना सांगितले,
“भारत सेमीफायनलसाठी पात्र ठरलाय ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे. या संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्यांनी त्याला साजेसा खेळ दाखवला. सलामी फलंदाजांनी भक्कम पाया रचला, तर जेमिमा रॉड्रिग्ज हिने तिसऱ्या क्रमांकावर येऊन आपली किंमत पुन्हा सिद्ध केली. गोलंदाजीनंही शानदार साथ दिली. या सामन्याचं महत्त्व संघानं ओळखलं आणि प्रत्येक खेळाडूनं आपलं सर्वोत्तम दिलं.”

दरम्यान, माजी खेळाडू आणि समालोचक अंजुम चोप्रा यांनी या विजयाला भारताच्या विश्वकप मोहिमेतील ‘निर्णायक क्षण’ असं संबोधलं.
त्यांनी सांगितलं,
“हा विजय केवळ आवश्यक नव्हता, तर निर्णायकही होता. ३२० पेक्षा जास्त धावा करणं आणि प्रतिस्पर्ध्यांना नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं होतं. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपण डगमगलो होतो, पण इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर हा विजय आत्मविश्वास परत आणणारा ठरला. आता दोन गुण मिळाल्याने सेमीफायनल निश्चित झाली, मात्र अजून विचार करायची गरज आहे — आपण सातत्याने ३००+ धावा करू शकतो का आणि त्या बचावू शकतो का?”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा