26 C
Mumbai
Thursday, July 25, 2024
घरविशेषवरळी अपघात प्रकरण - मिहीर शहा विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी!

वरळी अपघात प्रकरण – मिहीर शहा विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी!

मिहिरी शहा अपघातानंतर फरार

Google News Follow

Related

वरळी येथे रविवारी पहाटे झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याच्याविरुद्ध वरळी पोलिसानी लूक आऊट नोटीस (एलओसी) जारी केली आहे. मिहिरी शहा हा अपघातानंतर फरार झाला असुन तो देश सोडून पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे तत्याच्या विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती एका पोलीस अधिकारी यांनी दिली. दरम्यान या प्रकरणात मिहीरचे वडील तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी राजेश शहा आणि ड्रायव्हर राजऋषी बिदावत यांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. सोमवारी त्यांना शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

शिवसेनेचे (शिंदे गट) नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा (२२) याने त्याच्या बीएमडब्ल्यू या मोटारीने वरळीतील डॉ. ॲनी बेझंट रोडवर असलेल्या अट्रिया मॉलजवळ एका कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली, या धडकेनंतर मिहीर याने मोटार न थांबवता, दुचाकीवर असलेल्या महिलेला दोन किलोमीटर फरफटत नेले, त्यात कावेरी नाखवा महिलेचा मृत्यू झाला, तिचा पती प्रदीप नाखवा हे जखमी झाले होते. हे दाम्पत्य वरळी कोळीवाडा येथे राहणारे असून रविवारी पहाटे ते ससून डॉक येथे मासे खरेदी करण्यासाठी गेले होते, तेथून परतत असतांना हा अपघात झाला.

हे ही वाचा:

काश्मीरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांनी घरातील कपाटाच्या मागे खोदला होता बंकर

वरळी हिट अँड रन प्रकरणातील राजेश शाह यांना जामीन मंजूर !

मदनी यांच्या स्पष्टोक्तीनंतर तरी भाजपाचे डोळे उघडतील काय?

युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर रशियन क्षेपणास्त्र हल्ला

या अपघातानंतर पळून गेलेल्या मिहीर शहा याने वांद्रे कला नगर येथे अपघातग्रस्त मोटार सोडून दोन रिक्षा केल्या, एका रिक्षात चालकाला जाण्यास सांगून दुसऱ्या रिक्षात तो एकटाच निघून गेला. या दरम्यान मिहीर याने वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली, त्यानंतर त्याने आपला फोन स्विच ऑफ केला. या अपघात प्रकरणी वरळी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०५ ( सदोष मनुष्यवध) ,२८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे),१२५ (ब)( इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे),२३८( गुन्हेगाराला वाचविण्यासाठी गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे किंवा खोटी माहिती देणे),३२४(४)(नुकसान करणे) मोटार मोटार वाहन कायदा कलम- १८४,१३४(अ),१३४ (ब), १८७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी वरळी पोलिसांनी मिहिर शहाचे वडील राजेश शहा आणि चालक राजऋषी बिदावत यांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मिहिर हा फरार असुन त्याचा शोध घेण्यासाठी वरळी पोलिसांचे ६ विविध पथके त्याच्या मागावर असुन त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. मिहीर हा अटकेपासून स्वत:ला वाचवण्यासाठी देश सोडून पळून जाऊ शकतो असा संशय असुन त्याच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस (एलओसी ) जारी करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा