30 C
Mumbai
Tuesday, May 17, 2022
घरविशेष'बेबी' चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही!

‘बेबी’ चित्रपटातील एंजल आता ओळखताच येणार नाही!

Related

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक छोटे स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या नावाने आणि कामाने इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर काही असे आहेत ज्यांनी काहीही न बोलता प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यातील एक गोंडस बाळ म्हणजे बेबी चित्रपटातील लहानगी मुलगी.

या चित्रपटात त्या चिमुरडीने काहीही न बोलता हसत हसत सर्वांची मनं जिंकली होती. आता तेच गोंडस बाळ इतके मोठे झाले आहे की ओळखता देखील येत नाही. बेबी या चित्रपटात एंजलची भूमिका जुआना संघवीने साकारली होती. विद्या बालन आणि अक्षय कुमार यांच्या मुलीची भूमिका तिने साकारली होती.

तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिचे ताजे फोटो पाहून चाहत्यांना विश्वास बसणे कठीण आहे की ती तीच गोंडस मुलगी आहे. ही तीच मुलगी आहे, ती इतकी मोठी कधी झाली, विश्वास बसत नाही एवढी गोड एंजल कधी मोठी झाली ते. अशा बऱ्याच प्रतिक्रिया तिच्या फोटोवर येत आहेत.

हे ही वाचा:

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारांची घोषणा

योगींच्या प्रचारासाठी येणार ५०० परदेश स्थित भारतीय नागरिक

अमरावती स्वित्झर्लंड आणि चीनपेक्षाही सरस!

अक्कल’शून्य’ कारभारामुळे जमा झाले ३ कोटीऐवजी ३२ कोटी

 

जुआना संघवीने जेव्हा बेबी चित्रपटात एंजलची भूमिका साकारली होती तेव्हा ती अवघ्या सोळा महिन्यांची होती. आता तीच एंजल १७ वर्षाची झाली आहे. तिच्या नव्या प्रकल्पाबद्दल विचारले असता ती म्हणाली नव्या प्रोजेक्टबद्दल सध्या काही सांगता येणार नाही. मात्र, चाहत्यांना अक्षयसोबत तिला पुन्हा एकदा चित्रपटात पाहण्याची इच्छा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,882अनुयायीअनुकरण करा
9,320सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा