28 C
Mumbai
Friday, November 1, 2024
घरराजकारण'महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर'

‘महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर’

नाव न घेता शरद पवारांवर पंतप्रधान मोदींची टीका

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पुणे दौरा पार पडला.पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल झाले होते.पंतप्रधान मोदींनी यावेळी शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली.महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणा करून आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये केली.ते म्हणाले की, या भूमीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारखे अनेक संतसुधारक देशाला दिले आहेत. पुण्यात प्रत्येक क्षेत्राचे तज्ज्ञ उपस्थित आहेत.म्हणून म्हणतात ना ”पुणे तिथे काय उणे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसने देशात ६० वर्षांपर्यत राज्य केले.परंतु काँग्रेसच्या राज्यात एक अशी गोष्ट खरी होती ती म्हणजे देशातील अर्ध्या लोकांकडे बेसिक सुविधा नव्हत्या.आम्हाला केवळ १० वर्ष सेवा करण्याचा कार्यकाळ मिळाला.आम्ही या काळात मूलभूत सुविधांच्या गरजा पूर्ण केल्या.देशामध्ये, पुण्यामध्ये जी कामे झाली आहेत.ती मोदींची गॅरंटी आहे आणि लवकरच तोही दिवस येईल जेव्हा तुम्ही बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करत असाल.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसने, डॉ.मनमोहन सिंग यांच्या रिमोट वाली सरकारने १० वर्षात जेवढा इन्फ्रास्ट्रक्चर्सवर पैसा खर्च केला, तेवढा आम्ही एका वर्षात पैसा खर्च करतो.आजचा भारत युवा तरुणांचा आहे.आजचा युवा टेकनॉलॉजीवर भरोसा ठेवून पुढे जात आहे.स्टार्ट अप इंडियाचा कमाल बघा, केवळ १० वर्षात भारताच्या युवकांनी सव्वा लाख स्टार्ट अप तयार केले आहेत.विशेष म्हणजे यातील अनेक जण पुण्यातील आहेत.

हे ही वाचा:

मीरारोड लव्ह जिहाद प्रकरण; आरोपी मोहसीन शेखला अटक!

आमच्याविरुद्ध लढू न शकणारे आमचे फेक व्हीडिओ पसरवत आहेत!

अमित शहांच्या फेक व्हीडिओप्रकरणी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डीना समन्स

नागपूर, जयपूर आणि गोवा विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी!

२०१४ नंतर आमच्या सरकारने महागाईला आणि भरष्ट्राचाराला रोख लावली.गरिबांसाठी आम्ही जनऔषधी केंद्र सुरु केले, ज्यामध्ये एखादे औषध १०० रुपयास असेल तर ते गरिबाला २० रुपयात मिळेल.१० वर्षांपूर्वी भारतात मोबाईल आयत करावे लागायचे. पण आता भारत आज जगातला दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे. मेड इन इंडिया चिप्सने जगातल्या गाड्या चालताना दिसतील आणि माझं पुणे शहर तर ऑटोमोबाईल हब आहे. आता आम्ही भारताला इलेक्ट्रिक वेहिकलचा हब बनताना बघू. भाजपचा संकल्प हा भारताला सेमी कंडक्टर हब, इनोवेशन हबमध्ये बनवण्याचा आहे. भारतात हायड्रोजन हब बनवण्याचता संकल्प आहे. हे आमचे पहिले असे सरकार आहे ज्याने सर्वसामान्य नागरिकांचा विचार केला आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधानांनी टीका केली.पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही भटके आत्मे आहेत. ज्यांची इच्छा पूर्ण होत नाही, ज्यांची स्वप्ने अपुरी राहतात.. त्यांची आत्मा भटकत राहते.आमचा महाराष्ट्र सुद्धा या भटकती आत्माचा शिकार झाला आहे.महाराष्ट्रातील एका नेत्याने आपल्या महत्वाकांक्षासाठी हा खेळ ४५ वर्षांपूर्वी सुरू केला.त्यानंतर महाराष्ट्र अस्थिरतेच्या मार्गावर चालून गेला.त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली. हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नाहीत, तर स्वतःच्या पक्षालाही अस्थिर करतात.

एवढेच नाही तर अशा आत्मा स्वतःच्या कुटुंबातही अस्थिरता निर्माण करतात. जेव्हा १९९५ मध्ये भाजप आणि शिवेसनेची सरकार आली तेव्हा देखील या आत्म्याने सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता.
२०१९ मध्ये या आत्म्याने जनादेशाचा अपमान केला होता, हे महाराष्ट्रातील जनता जाणते आणि आता ही आत्मा देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ करत आहे.या अशा अस्थिर आत्मापासून बचाव करून भारताला स्थिर आणि मजबूत होऊन पुढे जाण्याची गरज आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा