33 C
Mumbai
Thursday, May 16, 2024
घरक्राईमनामाअमित शहांच्या फेक व्हीडिओप्रकरणी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डीना समन्स

अमित शहांच्या फेक व्हीडिओप्रकरणी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डीना समन्स

दिल्ली पोलीस रेवंथ रेड्डी यांच्या विरोधात ऍक्शन मोडमध्ये

Google News Follow

Related

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दिल्ली पोलीस हे रेवंथ रेड्डी यांच्या विरोधात ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ एडिट करुन चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. दिल्ली पोलिसांनी रेड्डी यांना समन्स बजावले आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या (INC) तेलंगणा युनिटद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक एडिटेड व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना समन्स बजावले आहे. रेवंथ रेड्डी हे तेलंगणातील आयएनसीचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम करतात. या समन्समधून रेड्डी यांना दिलेल्या तारखेला स्वतःला दिल्लीत उपस्थित राहण्यास सांगितले आहे, तसचे या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी त्यांना त्याच्या फोनसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. १ मे रोजी हजर राहण्याचं नोटिशीमध्ये म्हटलं आहे. सोबत दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ एडिटींशची ज्याचा संबंध आहे त्यालाही चौकशीसाठी घेऊन येण्याचं आदेशामध्ये म्हटलं आहे. माहितीनुसार, लवकरच दिल्ली पोलिसांचे एक पथक नोटीस घेऊन तेलंगणाला पोहचणार आहे. याप्रकरणी दिल्ली पोलीस मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासह काँग्रेसच्या पाच जणांची चौकशी करण्याच्या तयारीत आहेत.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या व्हिडिओशी छेडछाड केल्याप्रकरणी काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अमित शहा यांनी मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण संपुष्टात आणण्याचे वक्तव्य केले होते, मात्र त्यात छेडछाडी करून गृहमंत्री आरक्षण संपवण्याचा सल्ला देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या बनावट व्हिडिओवरून भाजपाने काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.

हे ही वाचा..

नागपूर, जयपूर आणि गोवा विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी!

मानखुर्दमध्ये लव्ह जिहाद: निजामने हिंदू तरुणीची केली हत्या, शरीराचे तुकडे करून भरले बॅगेत!

हुथी दहशतवाद्यांचा तेलवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला!

‘काँग्रेसचा इतिहास कलंकित मात्र तरीही पाहतात सत्तेचे स्वप्न’

अमित शाह यांचा हा व्हिडिओ व्हायरल होताच भाजपाने कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर हा व्हिडिओ एडिट करण्यात आल्याचे आढळून आले. मूळ व्हिडिओमध्ये अमित शहा यांनी तेलंगणातील मुस्लिमांचे असंवैधानिक आरक्षण संपुष्टात आणण्याचे वक्तव्ये केले आहे. तेलंगणातील या व्हिडिओत अमित शाह म्हणाले होते की, भाजपचे सरकार आल्यास आम्ही असंवैधानिक मुस्लिम आरक्षण संपवू. तेलंगणातील एससी, एसटी आणि ओबीसी समुदाय या आरक्षणाचे खरे हक्कदार आहेत आणि त्यांना मुस्लिम आरक्षण संपवून त्यांना त्यांचं हक्क देला जाईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा